खासदारांच्या लेटरपॅडसह सही, शिक्क्याचा गैरवापर
By Admin | Updated: November 30, 2015 01:14 IST2015-11-30T00:06:24+5:302015-11-30T01:14:13+5:30
विश्रामबाग येथील वारणाली रेल्वे गेट परिसरातील रुग्णालयात असलेल्या राजीव गांधी जीवनदायी योजनेत गैरकारभार सुरु आहे.

खासदारांच्या लेटरपॅडसह सही, शिक्क्याचा गैरवापर
सांगली : खासदार संजयकाका पाटील यांच्या लेटरपॅड व सही, शिक्क्याचा गैरवापर करून विश्रामबाग परिसरातील एका रुग्णालयात राजीव गांधी जीवनदायी योजनेत गैरकारभार सुरु असल्याची माहिती एका मेल आयडीवरून दिल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला. याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल रामराव खराडे (रा. पंचशीलनगर, सांगली) यांनी फिर्याद दाखल केली आहे.अमोल खराडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, विश्रामबाग येथील वारणाली रेल्वे गेट परिसरातील रुग्णालयात असलेल्या राजीव गांधी जीवनदायी योजनेत गैरकारभार सुरु आहे. त्यामुळे या योजनेतून या रुग्णालयाचे नाव कमी करावे, अशी माहिती इंडोस्पियर पॉवर अॅन्ड द रेट जीमेल डॉट कॉम या मेल आयडीवरून मुंबईतील वरळी येथील योजनेच्या कार्यालयात पाठविली आहे. पण ही माहिती खासदारांच्या लेटरपॅडवरुन पाठविण्यात आली आहे. लेटरपॅडवर बनावट सही व शिक्क्याचा वापर केला आहे. (प्रतिनिधी)