शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा चालकाचा मुलगा ठरला युवा पुरस्काराचा मानकरी; महाराष्ट्राच्या पुत्राची अभिमानास्पद भरारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 17:19 IST

ओंकार नवलिहाळकर या कोल्हापुरातील रिक्षाचालकाच्या मुलाने राष्ट्रीय युवा पुरस्कारावर मोहर उमटवून आईवडीलासह कोल्हापूरची मान अभिमानाने उंचावली आहे. केंद्र सरकारच्या नेहरु युवा केंद्रातर्फे दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून दोघांची निवड झाली आहे, त्यापैकी ओंकार यांच्या रुपाने कोल्हापुरला हा पुरस्कार मिळवण्याचा मान प्रथमच मिळाला आहे. येत्या १२ आॅगस्टला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे. ५0 हजार रुपये, मानपत्र, स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

ठळक मुद्देओंकार नवलिहाळकर युवा पुरस्काराचा मानकरी१२ आॅगस्टला राष्ट्रपतींच्या हस्ते होणार वितरण

कोल्हापूर: ओंकार नवलिहाळकर या कोल्हापुरातील रिक्षाचालकाच्या मुलाने राष्ट्रीय युवा पुरस्कारावर मोहर उमटवून आईवडीलासह कोल्हापूरची मान अभिमानाने उंचावली आहे. केंद्र सरकारच्या नेहरु युवा केंद्रातर्फे दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून दोघांची निवड झाली आहे, त्यापैकी ओंकार यांच्या रुपाने कोल्हापुरला हा पुरस्कार मिळवण्याचा मान प्रथमच मिळाला आहे. येत्या १२ ऑगस्टला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे. ५0 हजार रुपये, मानपत्र, स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.कळंबा ता. करवीर येथील राहणाऱ्या राजीव आणि स्नेहा नवलिहाळकर यांचा ओंकार हा एकुलता एक मुलगा. वडील रिक्षा चालवतात, संसाराला हातभार म्हणून स्नेहा यांनी अकाउंटण्ट म्हणून काम सुरु केले. लहानग्या ओंकारला पाळणाघरात ठेवून नवरा बायकोने संसार उभारण्यास सुरुवात केली. पण पाळणाघरात खेळता खेळता टाचणी लागल्याचे निमित्त होउन डोळ्याला इजा झाली. डाव्या डोळ्याला अंधत्व आले. हे अपराधीपणाचे ओझे वाहतच ओंकारला वेगळ्या पध्दतीने कुटूंबियांनी वाढवण्यास सुरुवात केली. स्वत: ओंकारने लहानग्या वयातच छोटी मोठी कामे करुन आईवडिलांना आर्थिक हातभार लावला.नेहरु युवा केंद्रातर्फे दरवर्षी युवकांना प्रेरणादायी काम करणाऱ्यां तरुणांची निवड राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी केली जाते. त्यासाठी १५ सप्टेबर २0१८ रोजी ऑनलाईन अर्ज भरुन घेण्यात आले. फेब्रुवारी २0१९ मध्ये त्याची पोलिसांमार्फत चौकशी प्रक्रिया पूर्ण झाली. सोमवारी १५ जुलैला पुरस्कार जाहीर झाल्याचे पत्र केंद्रीय युवक कल्याण व खेल मंत्रालयातर्फे देण्यात आले. या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून दोघांची निवड झाली. त्यात कोल्हापुरातून ओंकार नवलिहाळकर आणि नाशिकमधून विनीत मालपुरे यांचा समावेश आहे.

हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा पुरस्कार आहे. देशातील सर्वात महत्वाचा युवा पुरस्कार मला मिळतो, आणि तो ही राष्ट्रपतींच्या हस्ते याचा मला खूप आनंद झाला आहे. हा पुरस्कार मिळवणे हे प्रत्येक युवकाचे स्वप्न असते, ते मी पूर्ण केले आहे. पुरस्कार जाहीर झाल्याचे केंद्र सरकारचे पत्र हातात पडताच आईवडीलांच्या आनंदाला पारावर उरला नाही. तिघांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या, पण यावेळी त्या दु:खाच्या नव्हे तर आनंदाच्या होत्या.ओंकार नवलिहाळकर,पुरस्कार विजेता

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर