कोल्हापूरच्या चाँद शेख यांची रिक्षा प्रथम
By Admin | Updated: August 17, 2014 23:33 IST2014-08-17T23:16:28+5:302014-08-17T23:33:11+5:30
गडहिंग्लजला राज्यस्तरीय सौंदर्य रिक्षा स्पर्धा : स्वातंत्र्यदिनानिमित्त रासाई क्रीडा मंडळाचा उपक्रम

कोल्हापूरच्या चाँद शेख यांची रिक्षा प्रथम
गडहिंग्लज : शहरातील श्री रासाई क्रीडा व सांस्कृतिक मंडळातर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय सौंदर्य रिक्षा स्पर्धेत कोल्हापूरच्या चाँद दस्तगीर शेख यांच्या एमएच ०९, ३८४३ या रिक्षाने प्रथम क्रमांक पटकाविला.
स्पर्धेचा अन्य निकाल असा - अनिल गवळी (द्वितीय-गडहिंग्लज), दिलीप कांबळे (तृतीय-कोल्हापूर), सुहेल बागवान (चतुर्थ-नेसरी) व अमित शिंदे (उत्तेजनार्थ-चिक्कोडी) यांनी क्रमांक मिळविला. पंच म्हणून सचिन चव्हाण, संदीप पाटील, राजू झिरले, महादेव बुडगे, हरीश पोवार, तानाजी देवार्डे, बाळू माने, सचिन कुरळे यांनी काम पाहिले. यावेळी सांगलीच्या रत्नजीत पाटील यांनी ट्रॅक्टरवर विविध स्टंट करून दाखविले.
विजेत्यांना संतान बारदेस्कर, एस. पी. खोत, उदय पाटील, वैभव साबळे, एल. टी. नवलाज, प्रीतम कापसे, प्रवीण देवार्डे यांच्याहस्ते बक्षीस देण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष विनोद लाखे व तमान्ना बोरगावे यांनी स्वागत केले. प्रकाश पताडे यांनी सूत्रसंचालन केले. स्पर्धेसाठी आनंदा लाखे, शीतल दावणे, सूरज गवळी, प्रकाश शिरगांवे, प्रल्हाद लाखे, शरद घुंबरे, नितीन लाखे, अजित लाखे, महिंद्र सोनटक्के, कृष्णा लाखे, नितीन घुंबरे, अशोक लाखे, यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)