शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
3
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
4
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
5
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
6
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
7
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
8
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
9
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
10
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
11
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
12
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
13
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
14
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
15
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
16
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
17
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
18
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
19
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'
20
Raja Raghuvanshi : सोनमच्या भावाने २ मिनिटांत सत्य बाहेर काढले; राजा रघुवंशी हत्या प्रकरणी गोविंदाचा मोठा खुलासा

प्रजासत्ताकदिनी कोल्हापुरात रंगणार रिक्षा सौंदर्य स्पर्धा, रिक्षा चालकांचा थरार पाहायला मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 15:44 IST

स्पर्धेतून महाराष्ट्र रिक्षा सुंदरी, कोल्हापूर रिक्षा सुंदरी किताब देऊन गौरविण्यात येणार

कोल्हापूर : शिवाजीपेठेतील निवृत्ती चौक रिक्षा मित्रमंडळातर्फे प्रजासत्ताकदिनी (दि. २६ जानेवारी) सकाळी १० वाजता रिक्षा सौंदर्य राज्यस्तरीय स्पर्धा आणि प्रामाणिक रिक्षाचालकांचा सत्कार होणार आहे. स्पर्धेतून महाराष्ट्र रिक्षा सुंदरी, कोल्हापूर रिक्षा सुंदरी किताब देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती संयोजक आणि महाराष्ट्र रिक्षाचालक सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जाधव यांनी दिली.यंदा या स्पर्धेचे २३ वे वर्षे आहे. निवृत्ती चौकात दि.२६ जानेवारी रोजी सन २०१९ ते २०२२ आणि सन २०१९ या दोन गटात स्पर्धा होणार आहे. त्यातील महाराष्ट्र रिक्षा सुंदरी किताब पटकाविलेल्या रिक्षाचालकाला चांदीचे मेडल, मानाचा फेटा, तर कोल्हापूर रिक्षा सुंदरी किताबाचा मानकरी ठरलेल्या चालकाला सन्मानचिन्ह, मानाचा फेटा देऊन गौरविण्यात येईल. दोन्ही गटात प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धेत कोल्हापूरसह मुंबई, पुणे, सोलापूर, बेळगाव, कोकणातील सुमारे ४५ रिक्षाचालक सहभागी होतील. दोन चाकांवर आणि रिव्हर्स रिक्षा चालविण्याच्या प्रात्यक्षिकांचे स्पर्धेवेळी सादरीकरण होणार आहे. यावेळी विष्णुपंत पोवार, दीपक पोवार, संदीप जगताप, विनायक पत्रावळे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर