रिचा वोरा यांच्या चित्रास ब्रिटनमधील स्पर्धेत दुसरा क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:26 IST2021-05-18T04:26:20+5:302021-05-18T04:26:20+5:30

कोल्हापूर मुळच्या कोल्हापूरच्या असलेल्या रिचा वोरा यांच्या ‘मॉर्निंग आफ्टर’ या चित्राला ब्रिटनमध्ये घेण्यात आलेल्या ‘विकिंग ...

Richa Vora's painting ranks second in the competition in Britain | रिचा वोरा यांच्या चित्रास ब्रिटनमधील स्पर्धेत दुसरा क्रमांक

रिचा वोरा यांच्या चित्रास ब्रिटनमधील स्पर्धेत दुसरा क्रमांक

कोल्हापूर मुळच्या कोल्हापूरच्या असलेल्या रिचा वोरा यांच्या ‘मॉर्निंग आफ्टर’ या चित्राला ब्रिटनमध्ये घेण्यात आलेल्या ‘विकिंग क्ऱ्रूसेस ब्रिटिश आर्ट प्राईज २०२१’ या स्पर्धेत दुसरा क्रमांक प्राप्त झाला आहे. आर्टिस्ट अन्ड इलेस्ट्रेटर्स या नियतकालिकाने ही स्पर्धा आयोजित केली होती. तीन हजार चित्रांमधून रिच्या यांच्या या चित्राची दुसऱ्या क्रमांकासाठी निवड करण्यात आली.

वोरा टॉईजचे राजेश वोरा यांच्या कन्या असलेल्या रिचा यांचे शिक्षण कोल्हापुरात झाले आहे. त्यांना चित्रकलेची आवड असल्यामुळे त्यांनी प्रख्यात चित्रकार संजय शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या कारकीर्दीला सुरूवात केली. नील शाह यांच्याशी विवाह झाल्यानंतर रिचा या इग्लंडमध्ये स्थायिक झाल्या आहेत.

सोबत

दोन फोटो

Web Title: Richa Vora's painting ranks second in the competition in Britain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.