(सुधारीत) अमितकुमार पाटील, जयवंत जाधव, लायकर यांची कोल्हापुरात बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:31 IST2021-08-18T04:31:13+5:302021-08-18T04:31:13+5:30
कोल्हापूर : पोलीस बदल्यांचे सत्र सुरू असून मंगळवारी कोल्हापूर परिक्षेत्रातील सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज ...

(सुधारीत) अमितकुमार पाटील, जयवंत जाधव, लायकर यांची कोल्हापुरात बदली
कोल्हापूर : पोलीस बदल्यांचे सत्र सुरू असून मंगळवारी कोल्हापूर परिक्षेत्रातील सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी काढले. यामध्ये शाहूपुरी पोलीस ठाण्याचे परशुराम विष्णू कोरके आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या आरती नांद्रेकर यांची सातारा येथे बदली झाली, तर सांगलीतील सरिता महादेव लायकर, अमितकुमार पाटील आणि जयवंत जाधव, तसेच सोलापूर ग्रामीणचे प्रशांत पाटील यांची कोल्हापुरात बदली झाली आहे.
बदली झालेल्या सहायक पोलीस निरीक्षकांची नावे व बदलीचे ठिकाण (कंसात सध्याचे ठिकाण) : सरोजनी चव्हाण -सांगली (इस्पुर्ली पोलीस ठाणे, कोल्हापूर), गजेंद्र लोहार- सांगली (इचलकरंजी), समीर गायकवाड (२०२२ निवडणुकीपर्यंत मुदतवाढ), तुकाराम धोंडू राठोड- पुणे ग्रामीण (सोलापूर ग्रामीण), माधुरी बाळासाहेब तावरे-पुणे ग्रामीण (सोलापूर ग्रामीण), नीलेश नाथा बागाव-सोलापूर ग्रामीण (सांगली), सतीश शिवाजी शिंदे- पुणे ग्रामीण (सातारा), दत्तात्रय परशुराम दराडे - सातारा (सांगली), रमेश गायकवाड यांची विनंती बदली अमान्य केली. यापैकी अमितकुमार गायकवाड आणि नांद्रेकर यांची प्रशासकीय पातळीवर बदली झाली, तर कोरके यांची विनंती बदली केली आहे. विनंतीनुसार बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांनी स्वखर्चाने बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे आहे, तसेच त्यांना तत्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.