गृहराज्यमंत्री घेणार क्राईमचा आढावा
By Admin | Updated: July 21, 2014 00:41 IST2014-07-21T00:38:45+5:302014-07-21T00:41:40+5:30
जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची आज बैठक

गृहराज्यमंत्री घेणार क्राईमचा आढावा
कोल्हापूर : रमजान ईद, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री सतेज पाटील उद्या, सोमवारी पोलीस मुख्यालय येथे जिल्हा पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची विशेष बैठक दुपारी दोन वाजता घेणार आहेत.
जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. येथील कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावी, तसेच येऊ घातलेल्या रमजान ईद व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विशेष दक्षता घेण्यासाठी उपाययोजना, गुन्हे कमी होण्याच्या दृष्टीने कोणती मोहीम सुरू केली पाहिजे, तसेच पोलिसांच्या वैयक्तिक अडचणी, आदींवर गृहराज्यमंत्री चर्चा करणार आहेत. या बैठकीस कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार, पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल, पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)