‘महसूल’चे काम पूर्ववत सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 00:25 IST2017-10-17T00:25:40+5:302017-10-17T00:25:40+5:30

‘महसूल’चे काम पूर्ववत सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पुरवठा व महसूल विभागातील कर्मचाºयांकडून आठवड्याहून अधिक काळ चाललेले ‘काम बंद’ आंदोलन सरकारशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर स्थगित करण्यात आले; परंतु शनिवार व रविवार शासकीय सुटी असल्याने सोमवारपासून महसूलच्या कर्मचाºयांनी आपले काम पूर्ववत सुरू केले. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह तहसील कार्यालये गजबजून गेली.
राज्य शासनाने पुरवठा विभागातील ‘पुरवठा निरीक्षक’ हे पद सरळ सेवा परीक्षेतून भरण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या निषेधार्थ पुरवठा विभागातील कर्मचाºयांचे गेल्या दहा दिवसांपासून, तर त्यांना पाठिंबा दिलेल्या महसूल कर्मचाºयांचे चार दिवसांपासून ‘काम बंद’ आंदोलन सुरू होते. हे आंदोलन राज्यभर सुरू झाल्याने व दिवाळीच्या तोंडावर हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा महसूल कर्मचारी संघटनेने दिल्याने सरकार खडबडून जागे झाले. त्यानुसार शुक्रवारी दुपारी १२ वाजता मंत्रालयात महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखालील सकारात्मक निर्णय झाल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले; परंतु शनिवारी व रविवारी शासकीय सुटी असल्याने महसूलचे कर्मचारी सोमवारी हजर झाले. यामुळे महसूलचे कामकाज पूर्ववत सुरू झाले.