वाघजाई डोंगरावरील सपाटीकरणाची महसूलकडून दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:31 IST2021-09-10T04:31:17+5:302021-09-10T04:31:17+5:30
कोल्हापूर : करवीर आणि पन्हाळा तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या वाघजाई डोंगरावरील बेकायदेशीर सपाटीकरणाविरोधात परिसरातील १२ ग्रामस्थांनी दंड थोपटले आहेत. सपाटीकरणामुळे ...

वाघजाई डोंगरावरील सपाटीकरणाची महसूलकडून दखल
कोल्हापूर : करवीर आणि पन्हाळा तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या वाघजाई डोंगरावरील बेकायदेशीर सपाटीकरणाविरोधात परिसरातील १२ ग्रामस्थांनी दंड थोपटले आहेत. सपाटीकरणामुळे लगतच्या गावांना कमी वेळेत जास्त पाऊस पडल्यानंतर धोका निर्माण होऊ शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे. सुरुवातीला याकडे दुर्लक्ष करणाऱ्या महसूल प्रशासनास ‘लोकमत’ने लक्ष वेधल्यामुळे दखल घ्यावी लागली.
वाघजाई डोंगरावर धनदांडगे मनमानी पद्धतीने सपाटीकरण करीत आहेत. चर मारत आहेत. याकडे पन्हाळा महसूल प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांचा होता. यामुळे ग्रामस्थ वाघजाई डोंगर बचाव कृती समिती स्थापन करून सपाटीकरणास विरोध करीत आहेत. यासंबंधीच्या बातम्या ‘लोकमत’मध्ये ठळकपणे प्रसिद्ध झाल्यानंतर झोपेचे सोंग घेतलेले महसूल प्रशासन हडबडून जागे झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी डोंगरासंबंधीच्या जुन्या आदेशाची शोधाशोध करीत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनीही डोंगरातील गैरकामकाजात लक्ष घालणार असल्याचे जाहीर करताच शासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे.