शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

ए.एस. ट्रेडर्सचे परतावे झाले बंद, गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले, कंपनीच्या प्रमुखाचा व्हिडीओ व्हायरल

By विश्वास पाटील | Updated: November 23, 2022 10:24 IST

Kolhapur: कंपनी सध्या आर्थिक अडचणीतून जात असल्याने गुंतवणूकदारांचे परतावे थांबवण्यात येत असल्याची जाहीर कबुली ए. एस. ट्रेडर्ससह विविध कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक व ओनर लोहितसिंग धर्मसिंग सुभेदार (रा. सांगली) यांनी दिली आहे.

 - विश्वास पाटील 

कोल्हापूर - कंपनी सध्या आर्थिक अडचणीतून जात असल्याने गुंतवणूकदारांचे परतावे थांबवण्यात येत असल्याची जाहीर कबुली ए. एस. ट्रेडर्ससह विविध कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक व ओनर लोहितसिंग धर्मसिंग सुभेदार (रा. सांगली) यांनी दिली आहे. त्यासंबंधीचा त्यांचा स्वत:चा व्हिडीओ मंगळवारी व्हायरल झाला. परतावे बंदच्या घोषणेमुळे लाखो रुपयांची गुंतवणूक केलेल्या लोकांचे धाबे दणाणले आहेत.

सुमारे अडीच मिनिटांच्या अर्धवट व्हिडीओमध्ये सुभेदार यांनी कंपनीसमोरील अडचणी मांडल्या आहेत. त्यात ते म्हणतात, गेले काही दिवस परतावे देण्यात विलंब होत होता. परंतु, आज स्थिती अशी निर्माण झाली आहे की परतावे (रिटर्न्स ऑन इन्व्हेस्टमेंट) थांबविण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे. आपला निधी इक्विटीमध्ये सुरक्षित आहे. आजच्या घडीला ही कंपनी चालवायची की बंद करायची असा विचार माझ्या मनात घोळत आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कंपनीमध्ये गुंतवणूक केलेल्या ८ ते १० हजार गुंतवणूकदारांची झूम बैठक घेऊन त्यासंबंधीचा निर्णय घेऊ.

सुभेदार आजारी होते तर मग दुबईला कसे गेले, वेब मीटिंगला स्कीनवर दिसत होते तर मग ऑनलाईन शेअर ट्रेडिंग का केले नाही..? त्यांनी किती कंपन्यांची नोंदणी सेबीकडे केली आहे..? कंपनीचे कोणते खाते सेबीकडे सुरू आहे..? त्याचा पुरावा त्यांनी द्यावा, अशी मागणी एलएलपी विरोधी कृती समितीने केली आहे. या कंपनीने एक रुपयाचाही शेअर खरेदी केलेली नाही मग कोणत्या इक्विटीमध्ये पैसे अडकले, हे जाहीर करावे. गेल्या सहा महिन्यांत शेअर मार्केट वधारले असताना यांच्याच कंपनीला कसा तोटा झाला आणि परतावे थांबवण्याचा निर्णय कोणत्या कायद्यानुसार घेतला, अशी विचारणा समितीने केली आहे. पैसे द्यायला रांग का लागली..?ही कंपनी एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर महिन्याला तीन हजार रुपये परत देत असे. तीन वर्षांनंतर मूळ मुद्दलही परत मिळणार होती. हा बिझनेस जे लोक देतात त्यांना साखळीमधील गुंतवणुकीवरही वेगळे कमिशन मिळत होते. त्यामुळे त्यांनी स्वत:ची तर गुंतवणूक केलीच शिवाय लोकांना यामध्ये गुंतवणुकीस प्रोत्साहन दिले. एकाचे बघून एकाने पैसे गुंतवले. त्यातील काहींना लाभ झाला..बरेचसे आता अडकले.करवीर पूर्व भागात गुंतवणूकया कंपनीने कोल्हापूर जिल्ह्यातील गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये जमा केले आहेत. मुख्यत: करवीर तालुक्यातील बीडशेड, आरे, बीड, सावरवाडी, बहिरेश्वर, गणेशवाडी, माळ्याची शिरोली, कोपार्डे, शिंदेवाडी या गावांतून या कंपनीत काही कोटींमध्ये गुंतवणूक झाली आहे. लोकांनी बँकांतील ठेवी मोडून, सोने तारण ठेवून यामध्ये गुंतवणूक केली आहे. व्यापारी, दुकानदार, शिक्षक, छोट्या-मोठ्या शेतकऱ्यांनी रक्कम गुंतवली आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMONEYपैसा