कोरोनाला हरवून घरी परतणारे २०३८
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:18 IST2021-07-11T04:18:34+5:302021-07-11T04:18:34+5:30
कोल्हापूर : कोरोनाचे जिल्ह्यातील एकूण मृत्यू घटले असले तरी अजूनही रुग्णवाढ जैसे थेच असल्याने चिंता कायम आहे. मृत्यू व ...

कोरोनाला हरवून घरी परतणारे २०३८
कोल्हापूर : कोरोनाचे जिल्ह्यातील एकूण मृत्यू घटले असले तरी अजूनही रुग्णवाढ जैसे थेच असल्याने चिंता कायम आहे. मृत्यू व रुग्ण संख्येत देखील कोल्हापूर शहर आघाडीवर आहे. कागल, करवीर, हातकणंगले या तालुक्यातील वाढती मृत्युसंख्याही चिंताजनक आहे. विशेष परजिल्हा व राज्यातील एकही मृत्यू झालेला नाही, सर्वच्याच सर्व २५ मृत्यू हे जिल्ह्यातीलच आहेत. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाला हरवून घरी परतणाऱ्यांची संख्या शनिवारी दोन हजारच्यावर गेली.
जिल्ह्यात शनिवारी १६१४ नवे रुग्ण बाधित आढळले आहेत. अजूनही कोल्हापूर शहरात सर्वाधिक ३८७ रुग्ण बाधित आढळले आहे. करवीर तालुक्यात ३५९तर हातकणंगलेत २२२ रुग्ण आहेत. कागलमध्ये ९२ रुग्ण आहेत. या तालुक्यामध्ये मृत्यूचे प्रमाण चिंता वाढवणारे आहे. याउलट इचलकरंजीत रुग्णसंख्या ३३ पर्यंत खाली आली असून एकच मृत्यू आहे.
आज झालेले मृत्यू
कोल्हापूर शहर: ०८ कदमवाडी, राजेंद्रनगर, लक्षतिर्थ वसाहत, शिवाजी पेठ, आपटेनगर, ताराबाई पार्क, कपिलतीर्थ, मेनन बंगल्याजवळ,
करवीर : ०५ गांधीनगर, कळंबा, आरे, उचगाव, लवरेवाडी,
कागल: ०५ वाळवा खुर्द, गलगले, कागल दोन, सिध्दनेर्ली
हातकणंगले: ०५ सावर्डे, इचलकरंजी, नागाव, हातकणंगले, भादोले
पन्हाळा: ०१ वाघवे,
गडहिग्लज: ०१ कसबा नूल,
चौकट
९ वर्षीय बालिकेचा मृत्यू
कसबा नूल ता. गडहिग्लज येथील ९ वर्षीय बालिकेचा कोल्हापुरातील खासगी दवाखान्यात कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोराेनाने आतापर्यंत मृत्यू झालेल्या ० ते १० एका बालकाचा मृत्यू झाला आहे. हा कोरोना लाटेतील जिल्ह्यातील दुसरा मृत्यू ठरला आहे.