शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
2
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
3
"काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
4
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
5
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
6
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
7
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
8
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
9
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
10
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
11
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
12
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
13
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
14
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
15
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
16
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
17
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
18
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
20
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!

अखेर परदेशी फुटबॉलपटूंचे परतीचे तिकीट कन्फर्म, दिल्लीला निजामुद्दीनने रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 6:51 PM

लॉकडाऊनमुळे कोल्हापुरात अडकलेले केनियन फुटबॉलपटू डेव्हिड, ओला (शिवाजी तरुण मंडळ), लावेल, जोन्सन (बी.जी.एम. स्पोर्टस) हे शुक्रवारी (दि. १९)ला केनियाला जाण्यासाठी निजामुद्दीन एक्सप्रेसने दिल्लीला रवाना झाले.

ठळक मुद्देअखेर परदेशी फुटबॉलपटूंचे परतीचे तिकीट कन्फर्म, दिल्लीला निजामुद्दीनने रवानाशिवाजी तरुण मंडळ-बीजीएमच्या चार खेळाडूंचा समावेश

कोल्हापूर : लॉकडाऊनमुळे कोल्हापुरात अडकलेले केनियन फुटबॉलपटू डेव्हिड, ओला (शिवाजी तरुण मंडळ), लावेल, जोन्सन (बी.जी.एम. स्पोर्टस) हे शुक्रवारी (दि. १९)ला केनियाला जाण्यासाठी निजामुद्दीन एक्सप्रेसने दिल्लीला रवाना झाले.कोरोनाच्या संकटकाळात कोल्हापूरचाफुटबॉल हंगाम महापौर चषकदरम्यान अर्धवट स्थितीत संपला. याच काळात सरकारने रेल्वे, विमानसेवा बंद केल्यामुळे परदेशी नागरिकांना आपापल्या देशांत जाण्यावर निर्बंध आले. त्याचाच फटका कोल्हापुरातील शिवाजी तरुण मंडळाकडून करारबद्ध झालेल्या केनियाच्या ओला व डेव्हिड, तर बी. जी. एम. स्पोर्टसकडून खेळणाऱ्या लावेल आणि जोन्सन या चार फुटबॉलपटूंना बसला.

हे चारीही खेळाडू सहा महिन्यांच्या व्हिसावर कोल्हापुरात या दोन संघांकडून करारबद्ध झाले होते. त्यांचा करार जूनच्या पहिल्या आठवड्यात संपत होता. मात्र, केनियाला जाण्यासाठी त्यांना तिकीट उपलब्ध होत नव्हते. चारीही खेळाडूंनी नवी दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून केनियाला जाण्यासाठी तिकिटाचे आरक्षण केले होते. मात्र, दोन वेळा ते रद्द झाले. त्यानंतर पुन्हा प्रयत्न करून अखेरीस सोमवार (दि. २२) विमानाचे तिकीट निश्चित झाले. त्यानुसार चौघेजण शुक्रवारी निजामुद्दीन एक्सप्रेसने दिल्लीला रवाना झाले.

या खेळाडूंची गेले तीन महिने शिवाजी तरुण मंडळाचे प्रशिक्षक विशाल बोंगाळे, शिवतेज खराडे, निखिल कोराणे, तर बी. जी. एम.तर्फे अभिजित राऊत, इंद्रजित गायकवाड, विशाल माळी, स्वप्निल निकम यांनी उत्कृष्ट व्यवस्था केली होती.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFootballफुटबॉलkolhapurकोल्हापूरrailwayरेल्वे