कर्जमुक्ती योजनेतील बिनव्याजी रक्कम सभासदांना परत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:25 IST2021-03-27T04:25:21+5:302021-03-27T04:25:21+5:30
गेल्या सहा महिन्यांपासून आम्ही व्हीसीद्वारे सभा घेण्याची मागणी करत होतो; पण ऑनलाइन सभेमुळे आपले महत्त्व कमी होईल, या भीतीपोटी ...

कर्जमुक्ती योजनेतील बिनव्याजी रक्कम सभासदांना परत करा
गेल्या सहा महिन्यांपासून आम्ही व्हीसीद्वारे सभा घेण्याची मागणी करत होतो; पण ऑनलाइन सभेमुळे आपले महत्त्व कमी होईल, या भीतीपोटी आणि आर्थिक खर्च करण्यावर मर्यादा येणार असल्याने सत्ताधारी आघाडी ऑनलाइन सभा घेण्यास तयारी नव्हती; परंतु सहकार खात्याचा आदेश आल्याने आघाडीला ऑनलाइन सभा घेण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे नाखूश होऊन सत्ताधारी आघाडीने सभा आयोजित केली असल्याचे प्रा. घोरपडे यांनी सांगितले. सत्ताधाऱ्यांकडून पतसंस्थेच्या तोट्यातील शाखांमधील कर्मचाऱ्यांचा खर्च सभासदांच्या माथ्यावर मारला जात आहे. संस्था सॉफ्टवेअर खरेदी एएमसीच्या नावाखाली वारेमाप खर्च करून आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासह सभासदांच्या जिव्हाळ्याच्या मागण्या सत्ताधाऱ्यांनी मान्य कराव्यात. या मागण्यांबाबत राजर्षि शाहू लोकशाही विकास आघाडीच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे प्रा. घोरपडे यांनी सांगितले. यावेळी संचालक संदीप पाटील, संजय जाधव, माजी संचालक बाळासाहेब चिंदगे, बी. एस. खामकर, प्रताप जगताप, विनोद उत्तेकर, एस. एम. पाटील, सुरेख खोत, आदी उपस्थित होते.
चौकट
आरोप बिनबुडाचे
समीर घोरपडे यांचे आरोप बिनबुडाचे आणि जुनेच आहेत. तीन वर्षे आमच्यासोबत होते, त्यावेळी त्यांना चुकीचा कारभार दिसला नाही. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून चांगल्या चाललेल्या संस्थेची बदनामी त्यांच्याकडून सुरू असल्याची प्रतिक्रिया ‘कोजिमाशि’चे अध्यक्ष बाळ डेळेकर यांनी व्यक्त केली.