सापडलेला मोबाईल प्रामाणिकपणे परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:54 IST2020-12-05T04:54:27+5:302020-12-05T04:54:27+5:30

त्याच्या प्रामाणिकपणाची म्हाकवेकरांना मोहिनी, सापडलेला मोबाईल परत, ऊसतोड मजुराच्या मुलाचा प्रामाणिकपणा म्हाकवे : निंबोणी (ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) ...

Retrieved mobile honestly returned | सापडलेला मोबाईल प्रामाणिकपणे परत

सापडलेला मोबाईल प्रामाणिकपणे परत

त्याच्या प्रामाणिकपणाची म्हाकवेकरांना मोहिनी, सापडलेला मोबाईल परत, ऊसतोड मजुराच्या मुलाचा प्रामाणिकपणा

म्हाकवे : निंबोणी (ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) येथील शरद राजेंद्र हेगडे याने सापडलेला महागडा मोबाईल प्रामाणिकपणे परत केला. शिक्षक नेते सुनील पाटील यांनी आपला मोबाईल परत केल्याबद्दल रोख बक्षीस देऊन त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. म्हाकवे येथे ऊसतोड मजुरीसाठी हेगडे कुंटुब आले आहे. आई-वडिलांसोबतच १२वी.पर्यंत शिक्षण झालेला शरद हा येथील माळावरच सैन्यभरतीची तयारी करत आहे. यावेळी फिरायला गेलेल्या पाटील यांचा मोबाईल त्याला सापडला. त्याने तो प्रामाणिकपणे परत केला.

दरम्यान, सुनील पाटील, सर पिराजीराव पतसंस्थेचे माजी अध्यक्ष अनिल पोवार, उद्योगगपती विठ्ठल शिंदे, क्रीडाशिक्षक संजय हवालदार यांनी शरदला त्याच्या इच्छेनुसार सैन्य भरतीसाठी सहकार्य करण्याचे अभिवचनही दिले.

Web Title: Retrieved mobile honestly returned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.