सौरभ पाटील, शिवानी गायकवाड यांना ‘निवृत्त शिक्षक शिष्यवृत्ती’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:30 IST2021-09-09T04:30:52+5:302021-09-09T04:30:52+5:30
पदार्थ विज्ञान अधिविभागात सन १९६५ ते १९९९ इतका प्रदीर्घ काळ अध्यापन व संशोधनाचे कार्य केल्यानंतर निवृत्त झालेल्या प्रा. बी. ...

सौरभ पाटील, शिवानी गायकवाड यांना ‘निवृत्त शिक्षक शिष्यवृत्ती’
पदार्थ विज्ञान अधिविभागात सन १९६५ ते १९९९ इतका प्रदीर्घ काळ अध्यापन व संशोधनाचे कार्य केल्यानंतर निवृत्त झालेल्या प्रा. बी. व्ही. खासबारदार यांच्यासारख्या समर्पित वृत्तीच्या शिक्षकाने पदार्थ विज्ञान अधिविभागात ‘कमवा व शिका’ योजनेतून अभ्यास करून त्याअंतर्गत उत्तम शैक्षणिक कामगिरी बजावून एम.एस्सी. भाग-दोनमध्ये प्रविष्ट झालेल्या पहिल्या दोन विद्यार्थ्यांना ‘निवृत्त शिक्षकाची शिष्यवृत्ती’ देण्यासाठी विद्यापीठाकडे काही निधी दिला. त्यातून शिष्यवृत्ती दरवर्षी प्रदान करण्यात येते. प्रा. खासबारदार यांनी आदर्श घालून दिला असल्याचे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगितले. प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, अधिविभाग प्रमुख डॉ. के. वाय. राजपुरे यांनी प्रा. खासबारदार यांच्या अध्यापन कौशल्याचा वेध घेतला. डॉ. एन. एल. तरवाळ यांनी मनोगत व्यक्त केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक जी.आर. पळसे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी आर. वाय. लिधडे, सहाय्यक कुलसचिव डी. डी. सावगावे उपस्थित होते. पदव्युत्तर प्रवेश विभागाच्या उपकुलसचिव बी. एम. नाळे यांनी प्रास्ताविक केले.
फोटो (०८०९२०२१-कोल-शिष्यवृत्ती फोटो) : शिवाजी विद्यापीठात सोमवारी सौरभ पाटील आणि शिवानी गायकवाड यांना कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते निवृत्त शिक्षक शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले. यावेळी शेजारी डावीकडून एन. एल. तरवाळ, आर. वाय. लिधडे, विलास नांदवडेकर, जी. आर. पळसे, के. वाय. राजपुरे, बी. एम. नाळे, डी. डी. सावगावे आदी उपस्थित होते.
080921\08kol_5_08092021_5.jpg
फोटो (०८०९२०२१-कोल-शिष्यवृत्ती फोटो) : शिवाजी विद्यापीठात सोमवारी सौरभ पाटील आणि शिवानी गायकवाड यांना कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते निवृत्त शिक्षक शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले. यावेळी शेजारी डावीकडून एन.एल. तरवाळ, आर.वाय. लिधडे, विलास नांदवडेकर, जी.आर. पळसे, के.वाय. राजपुरे, बी.एम. नाळे, डी.डी. सावगावे आदी उपस्थित होते.