सेवानिवृत्त अधिकाऱ्याची ग्रामीण रुग्णालयाला ५१ हजारांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:18 IST2021-07-11T04:18:18+5:302021-07-11T04:18:18+5:30

हालेवाडी (ता. आजरा ) येथील सेवानिवृत्त अधिकारी जयवंत सदाशिव पन्हाळकर यांनी सेवानिवृत्ती वेतनातून ग्रामीण येथील गोरगरीब व गरजू रुग्णांना ...

Retired officer donates Rs 51,000 to rural hospital | सेवानिवृत्त अधिकाऱ्याची ग्रामीण रुग्णालयाला ५१ हजारांची मदत

सेवानिवृत्त अधिकाऱ्याची ग्रामीण रुग्णालयाला ५१ हजारांची मदत

हालेवाडी (ता. आजरा ) येथील सेवानिवृत्त अधिकारी जयवंत सदाशिव पन्हाळकर यांनी सेवानिवृत्ती वेतनातून ग्रामीण येथील गोरगरीब व गरजू रुग्णांना औषध उपचारासाठी ५१ हजार रुपयांची मदत केली आहे. माणुसकीच्या भावनेतून गरजू लोकांना केलेली मदत निश्चितच कौतुकास्पद आहे असे वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक फर्नांडिस यांनी सांगितले.

हालेवाडी येथील जयवंतदादा सदाशिव पन्हाळकर यांनी ग्रामीण रुग्णालयातील गरजू व गरीब लोकांना औषध उपचारासाठी ५१ हजारांची मदत केली आहे. मदतीची ५१ हजारांची रक्कम देण्यासाठी ते उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र त्यांचे ज्येष्ठ बंधू गंगाराम पन्हाळकर व त्यांच्या भगिनी शांताबाई शिंत्रे, बळवंत शिंत्रे यांच्या हस्ते ही रक्कम वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वृषाली केळकर यांच्याकडे देण्यात आली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक फर्नांडिस, संवेदना फाउंडेशनचे डॉ. प्रवीण निंबाळकर, संग्राम आपके, डॉ. आसिफ बागवान,डॉ. सागर तेऊरवाडकर, डॉ. प्रतीक्षा कोरे, बी. आर. पाटील एस.पी. बुधवंत, मिलिंद गुरव, ताहीर शेख कर्मचारी उपस्थित होते.

१० आजरा मदत

फोटो कॅप्शन - आजरा ग्रामीण गं व गरजू रुग्णांना औषधोपचारासाठी ५१ हजारांची मदत डॉ. वृषाली केळकर यांचेकडे देताना गंगाराम पन्हाळकर शेजारी डॉ. अशोक फर्नांडिस, शांताबाई शिंत्रे, बळवंत शित्रे यासह अन्य.

---------------------------------------

(कृपया फोटो कॅप्शन अपूर्ण वाटते--आजरा ग्रामीण गं.....

Web Title: Retired officer donates Rs 51,000 to rural hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.