निवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी बा. ग. जोशी यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:30 IST2021-02-17T04:30:18+5:302021-02-17T04:30:18+5:30

कोल्हापूर : अंबाई टँक परिसर, सावित्रीबाई फुले हौसिंग साेसायटी येथील निवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळकृष्ण गणेश जोशी (वय ८१) ...

Retired Additional Collector Ba. C. Joshi passes away | निवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी बा. ग. जोशी यांचे निधन

निवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी बा. ग. जोशी यांचे निधन

कोल्हापूर : अंबाई टँक परिसर, सावित्रीबाई फुले हौसिंग साेसायटी येथील निवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळकृष्ण गणेश जोशी (वय ८१) यांचे शुक्रवारी निधन झाले. बा. ग. जोशी नावाने ते परिचित होते. कोल्हापूर महापालिकेमध्ये उपायुक्त म्हणून त्यांनी काम केले होते. त्यांनी प्रभारी आयुक्त म्हणूनही काही दिवस काम पाहिले. मंत्रालयात सामान्य प्रशासनातही त्यांनी सेवा बजावली. अत्यंत खुमासदार बोलणे व तसेच लिहिण्यासाठी ते प्रसिद्ध होते. कोल्हापुरी माणसाच्या वागण्या-बोलण्याचे त्यांचे उत्तम निरीक्षण होते. त्यांचे विनोदी लेखनाचे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. त्यांच्या पश्चात भाऊ, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

फोटो : १६०२२०२१ काेल बाळकृष्ण जोशी निधन

रुक्मिणी केंबळे

कोल्हापूर : भोसलेवाडी येथील समाजसेवा हौसिंग सोसायटीतील रुक्मिणी कुंडलिक केंबळे (वय ७५) यांचे मंगळवारी निधन झाले. समाजसेवा हौसिंग सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष कुंडलिक केंबळे यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, बुधवारी आहे.

फोटो : १६०२२०२१ कोल रुक्मिणी केंबळे (निधन)

Web Title: Retired Additional Collector Ba. C. Joshi passes away