शिवाजी विद्यापीठाच्या विविध २१ परीक्षांचा निकाल जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:40 IST2021-05-05T04:40:11+5:302021-05-05T04:40:11+5:30
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाने हिवाळी सत्रात घेतलेल्या विविध २१ परीक्षांचा ऑनलाईन निकाल परीक्षा व मूल्यमापन मंडळाने जाहीर केला आहे. ...

शिवाजी विद्यापीठाच्या विविध २१ परीक्षांचा निकाल जाहीर
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाने हिवाळी सत्रात घेतलेल्या विविध २१ परीक्षांचा ऑनलाईन निकाल परीक्षा व मूल्यमापन मंडळाने जाहीर केला आहे. त्यामध्ये बी. फार्म. सेमिस्टर पाच आणि सहा, एम. आर्क (सीबीसीएस) सेमिस्टर तीन, बी. कॉम., आयटी सेमिस्टर पाच, ॲप्लाॅईड केमिस्ट्री सेमिस्टर आदी अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
विद्यापीठाने हिवाळी सत्रातील परीक्षा दि. २२ मार्चपासून ऑनलाईन पद्धतीने फौंड्री टेक, बी. एस्सी. इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (एंटायर) सेमिस्टर पाच, बी. व्होक. प्रिंटींग अँड पब्लिशिंग सेमिस्टर पाच, ॲग्रीकल्चर सेमिस्टर पाच, बी. एस्सी. बायोटेक्नॉलॉजी (एंटायर सेमिस्टर पाच), बी. टेक (क्रेडिट बेसिस) सेमिस्टर तीन आणि पाच, एम. आर्क (रेग्युलर) सेमिस्टर तीन, बी. व्होक रिटेल मॅॅनेजमेंट अँड आयटी सेमिस्टर सहा, एमसीए सेमिस्टर तीन आणि पाच, बी. व्होक. इन फूड प्रोसेसिंग अँड मॅॅनेजमेंट सेमिस्टर तीन आणि चार, बी. व्होक. ॲॅटोमोबाईल सेमिस्टर पाच, सस्टेनेबल ॲग्रीकल्चर मॅॅनेजमेंट सेमिस्टर पाच, बी. एस्सी. कॉम्प्युटर सायन्स (एंटायर) सेमिस्टर पाच या परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे. अभ्यासक्रमनिहाय परीक्षा झाल्यानंतर ८ ते २५ दिवसांमध्ये निकाल लावण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असल्याची माहिती परीक्षा मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी मंगळवारी दिली.
चौकट
मे अखेरपर्यंत परीक्षा
बहुतांश अभ्यासक्रमांच्या हिवाळी सत्रातील परीक्षा येत्या दोन दिवसांमध्ये पूर्ण होतील. त्यानंतर काही परीक्षा होणार असून त्या दि. ३१ मे पर्यंत चालणार आहेत. त्यानंतर तीन आठवड्यापर्यंत सर्व निकाल जाहीर करण्याचे नियोजन असल्याचे पळसे यांनी सांगितले.