शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

दहावी फेरपरीक्षेत कोल्हापूर विभागाचा निकाल घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 16:43 IST

दहावीच्या फेरपरीक्षेत कोल्हापूर विभागाचा निकाल १७.१२ टक्के लागला. विभागाचा निकाल १.८३ टक्क्यांनी घटला आहे. कोल्हापूर, सांगली व साताऱ्या जिल्ह्यातील एकूण १३९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ३.८८ टक्क्यांनी अधिक आहे.

ठळक मुद्देदहावी फेरपरीक्षेत कोल्हापूर विभागाचा निकाल घटला१३९१ विद्यार्थ्यांचे वर्ष वाचले; मुलींची आघाडी कायम; निकालात १.८३ टक्क्याने घट

कोल्हापूर : दहावीच्या फेरपरीक्षेत कोल्हापूर विभागाचा निकाल १७.१२ टक्के लागला. विभागाचा निकाल १.८३ टक्क्यांनी घटला आहे. कोल्हापूर, सांगली व साताऱ्या जिल्ह्यातील एकूण १३९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ३.८८ टक्क्यांनी अधिक आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जुलै-आॅगस्टमध्ये घेतलेल्या फेरपरीक्षेचा निकाल बुधवारी दुपारी एक वाजता आॅनलाईन जाहीर केला.कोल्हापूर विभागाच्या निकालाची माहिती राज्य शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव टी. एल. मोळे यांनी दिली. यावेळी शिक्षण उपनिरीक्षक डी. एस. पवार, लेखाधिकारी एस. एल. रेणके, साताऱ्याच्या शिक्षण विस्तार अधिकारी एम. जी. चंदुरे, सांगलीचे विज्ञान पर्यवेक्षक पी. एस. मलगुंडे उपस्थित होते. राज्य शिक्षण मंडळाकडून दि ९ जुलै ते २ आॅगस्ट दरम्यान फेरपरीक्षा घेण्यात आली.

या परीक्षेसाठी कोल्हापूर विभागाअंतर्गत कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील ८१५४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ८१२६ जणांनी परीक्षा दिली. त्यापैकी १३९१ जण उत्तीर्ण झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी विभागाचा निकाल १.८३ टक्क्यांनी घटला आहे. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण २० टक्के, तर मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण १६. १२ टक्के आहे.

विभागामध्ये कोल्हापूर जिल्हा २२. ५७ टक्क्यांसह प्रथम क्रमांकावर आहे. सांगली १६.६३ टक्क्यांसह द्वितीय, तर ९.५८ टक्क्यांसह सातारा जिल्हा तृतीय क्रमांकावर आहे. राज्याच्या एकूण निकालात कोल्हापूर विभाग आठव्या क्रमांकावर आहे. निकालाची आॅनलाईन प्रत विभागीय मंडळाच्या संकेतस्थळावरून घेता येणार असल्याचे विभागीय सचिव मोळे यांनी सांगितले.

जिल्हानिहाय निकालजिल्हा टक्केवारी

  1.  कोल्हापूर २२.५७
  2.  सांगली १६.६३
  3.  सातारा ९.५८

 

विभागातील आकडेवारी दृष्टिपेक्षात

  1. उत्तीर्ण मुलांची संख्या : ९७४
  2. उत्तीर्ण मुलींची संख्या : ४१७
  3. कोल्हापूरमधील उत्तीर्ण विद्यार्थी : ५७८
  4. सांगलीतील उत्तीर्ण विद्यार्थी : ५१५
  5. साताऱ्यातील उत्तीर्ण विद्यार्थी : २९८

 

कोल्हापूरमध्ये सर्वाधिक गैरमार्ग प्रकरणेया परीक्षेत कोल्हापूर विभागात परीक्षा केंद्रावर सहा गैरमार्गाची प्रकरणे घडली. त्यातील सर्वाधिक सहा प्रकरणे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. साताऱ्यामध्ये एक प्रकरण घडले. त्यातील परीक्षार्थींवर शिक्षण मंडळांकडून कारवाई करण्यात आली आहे, असे विभागीय सचिव मोळे यांनी सांगितले. ते म्हणाले, उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळविण्याची मुदत ३० आॅगस्ट ते १८ सप्टेंबरपर्यंत, तर गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदत दि. ८ सप्टेंबरपर्यंत आहे.

 

टॅग्स :SSC Results 2018दहावी निकाल २०१८kolhapurकोल्हापूर