शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर विमानतळ परिसरात बांधकामास मर्यादा, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 14:06 IST

कोल्हापूर : विमानतळाच्या २० किलोमीटरच्या परिसरात विमानतळ प्राधिकरणाच्या ‘ना हरकत दाखल्या’शिवाय कोणतेही बांधकाम करता येणार नाही, अशा स्पष्ट सूचना ...

कोल्हापूर : विमानतळाच्या २० किलोमीटरच्या परिसरात विमानतळ प्राधिकरणाच्या ‘ना हरकत दाखल्या’शिवाय कोणतेही बांधकाम करता येणार नाही, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी विमानतळ पर्यावरण व्यवस्थापन समितीची बैठक झाली. या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. विमानतळ परिसरात उघड्यावर कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाईचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.या बैठकीमध्ये कचरा व्यवस्थापन व आसपासच्या गावातील कचऱ्यामुळे पशू-पक्ष्यांची गर्दी वाढत असून, यामुळे विमान सेवेत येत असलेल्या अडचणीबद्दल विशेष चर्चा करण्यात आली. विमानतळाच्या आसपासच्या परिसरामध्ये व रस्त्यांवर कोणत्याही प्रकारचा कचरा उघड्यावर न टाकण्याबद्दल येडगे यांनी निर्देश दिले. कचरा निर्मूलन प्रकल्प व सांडपाणी नियंत्रणासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी करवीर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय यादव यांना दिल्या. तसेच तामगावकडे जाणाऱ्या रस्त्याचे वळतीकरण सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागास देण्यात आले. विमानतळाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून प्रलंबित जमीन अधिग्रहणासाठी अधिकाऱ्यांनी आग्रही भूमिका घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच विमान वाहतुकीस अडथळा होऊ नये यासाठी कोल्हापूर व आसपासच्या वीस किलोमीटर परिक्षेत्रातील सर्व बांधकामास विमानतळ प्राधिकरणाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेण्याचे बंधनकारक आहे. ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेतल्याशिवाय बांधकामास परवानगी देण्यात येऊ नये अशाही सूचना त्यांनी दिल्या.भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या ‘ना हरकत प्रमाणपत्र’ ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर वेब पोर्टलवर अर्ज करण्याच्या सूचनेचे फलक सर्व ग्रामपंचायती, टाऊन प्लॅनिंग कार्यालयास यावेळी सुपूर्द करण्यात आले. विमानतळ प्राधिकरणाचा ना हरकत दाखला घेतल्याशिवाय बांधकाम करू नका, असे आवाहनही यावेळी प्राधिकरणाकडून करण्यात आले.यावेळी प्रांताधिकारी हरीष धार्मिक, विमानतळ संचालक अनिल शिंदे, विमान वाहतूक प्रमुख राजेश अस्थाना, वरिष्ठ व्यवस्थापक दीपक जाधव, विशाल खरात, दर्पण सादये, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहिता तोंदले, श्री. कांजर, बीएसएनएलचे श्री. देशमुख, इंडिगोचे चंदनसिंह, स्टार एअरचे नंदकुमार गुरव, करवीर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय यादव उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAirportविमानतळ