शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कॉँग्रेस नगरसेवकाना सोपविल्या जबाबदाऱ्या, शहरातील नेतृत्व शारंगधर देशमुख यांच्याकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 15:51 IST

पक्षीय निर्बंधांमुळे यापुढे उघडपणे शिवसेनेचे प्रचार करता येणार नाही, ही अडचण लक्षात घेऊन आमदार सतेज पाटील यांनी महानगरपालिकेतील नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांच्यावर काही जबाबदाऱ्या सोपविल्या. शिवसेनेच्या प्रचाराची सगळी सूत्रे आता गटनेते शारंगधर देशमुख सांभाळणार आहेत.

ठळक मुद्देकॉँग्रेस नगरसेवकाना सोपविल्या जबाबदाऱ्या शहरातील नेतृत्व शारंगधर देशमुख यांच्याकडे

कोल्हापूर : पक्षीय निर्बंधांमुळे यापुढे उघडपणे शिवसेनेचे प्रचार करता येणार नाही, ही अडचण लक्षात घेऊन आमदार सतेज पाटील यांनी महानगरपालिकेतील नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांच्यावर काही जबाबदाऱ्या सोपविल्या. शिवसेनेच्या प्रचाराची सगळी सूत्रे आता गटनेते शारंगधर देशमुख सांभाळणार आहेत.बुधवारी रात्री ‘अजिंक्यतारा’ कार्यालयात ही बैठक झाली. त्यावेळी कॉँग्रेस पक्षाचे अनेक नगरसेवक उपस्थित होते. या बैठकीला आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून धनंजय महाडिक यांचे नाव बुधवार (दि. १३) पर्यंत जाहीर झाले नव्हते. त्यामुळे आमदार पाटील यांनी गेल्या काही दिवसांपासून महाडिक यांच्यावर सातत्याने टीका करुन त्यांचा पराभव करण्याचे आवाहन जाहीर सभा, कार्यक्रमातून केले होते.परंतु राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून धनंजय महाडिक यांच्या नावाची घोषणा झाली. त्यामुळे आमदार पाटील यांना आता पक्षीय निर्बंधामुळे उघडपणे विरोधाची भूमिका घेता येणार नाही. जरी ते महाडिक यांच्या विरोधात सक्रिय राहणार नसले तरी त्यांच्या गटाच्या नगरसेवकांना तसेच कार्यकर्त्यांना जो संदेश द्यायचा तो त्यांनी देऊन टाकला.

कोणी कोणत्या भागात कशा प्रकारे शिवसेनेचा प्रचार करायचा, याचे नियोजन करून त्याच्या जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत. कॉँग्रेसचे महानगरपालिकेतील गटनेते शारंगधर देशमुख यांच्यावर शहरातील जबाबदारी दिली. पडद्याआडून मात्र आमदार पाटील यांचा विरोध हा कायमच राहणार आहे.

पी. एन. पाटील महापालिकेतमहाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार पी. एन. पाटील बुधवारी (दि. १३) दुपारी अचानक महानगरपालिकेत आल्याचे पाहून कॉँग्रेस पदाधिकारी तसेच नगरसेवकांना आश्चर्य वाटले. महापालिका चौकात गाडीतून उतरताच पी. एन. पाटील थेट आयुक्त कार्यालयात गेले. मंत्रालयातील एका अधिकाऱ्यासोबत पी. एन. आयुक्तांना भेटायला गेले होते, असा खुलासा नंतर झाला.

ही बातमी कळताच उपमहापौर भूपाल शेटे, स्थायी समितीचे सभापती शारंगधर देशमुख यांनी आयुक्त कार्यालयात जाऊन पी. एन. यांना आपल्या कक्षात नेले; परंतु या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. केवळ अनौपचारिक गप्पा झाल्या. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर