लिंगनूर येथे विविध स्पर्धांना प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:26 IST2021-03-17T04:26:20+5:302021-03-17T04:26:20+5:30

लिंगनूर कानूल (ता. गडहिंग्लज) येथे ग्रामपंचायत व अण्णाप्रेमी ग्रुपतर्फे आयोजित विविध स्पर्धांना महिला व युवतीचा प्रतिसाद मिळाला. सरपंच अ‍ॅड. ...

Response to various competitions at Lingnur | लिंगनूर येथे विविध स्पर्धांना प्रतिसाद

लिंगनूर येथे विविध स्पर्धांना प्रतिसाद

लिंगनूर कानूल (ता. गडहिंग्लज) येथे ग्रामपंचायत व अण्णाप्रेमी ग्रुपतर्फे आयोजित विविध स्पर्धांना महिला व युवतीचा प्रतिसाद मिळाला. सरपंच अ‍ॅड. परमेश्वरी राजशेखर पाटील अध्यक्षस्थानी होते.

रांगोळी स्पर्धेत सुचिता सिद्धेश्वर घुगरे, गोपी बसवराज घुगरे, ऋतुजा सुतार, वैष्णवी येसरे, माया जाधव, स्वाती पाटील, संजीवनी येसरे, शिवलीला पाटील, प्रतीक्षा शेटके यांनी, तर उत्तेजनार्थ उजमान मुल्लाणी, स्नेहल जोशिलकर, पूनम कुराडे, मनीषा येसरे, सुप्रिया झिरले, कोमल भुरगुडा यांनी यश मिळविले.

यावेळी कुस्ती प्रकारात यश मिळविल्याबद्दल वैष्णवी बसवराज पाटील, धावपटू गायत्री पाटील, आशा सेविका सुनीता जोशीलकर यांच्यासह उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा यावेळी सत्कार झाला.

यावेळी उपसरपंच दीपक राजगोळे, यावेळी तलाठी जितेंद्र माने, ग्रामसेविका वैशाली कुरळे, मलगोंडा पाटील, संतोष पाटील, संजय कांबळे, उज्ज्वला कुरळे, कमल कुडचे, मनीषा ढेंगे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

---------------------------

फोटो ओळी : लिंगनूर कानूल (ता. गडहिंग्लज) येथे सरपंच परमेश्वरी पाटील यांच्या हस्ते युवा महिला कुस्तीपट्टू वैष्णवी पाटील हिचा सत्कार झाला. मनिषा ढेंगे, विद्या खांडेकर, उज्ज्वला कुरळे, कमल कुडचे, रमा पाटील, बसवराज पाटील उपस्थित होते.

फोटो क्रमांक : १६०३२०२१-गड-०७

Web Title: Response to various competitions at Lingnur