मिशन संवेदना उपक्रमास शिरोळमध्ये प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:24 IST2021-05-19T04:24:38+5:302021-05-19T04:24:38+5:30
सहायक पोलीस निरीक्षक शिवानंद कुंभार, स्वामी समर्थ सूतगिरणीचे कार्यकारी संचालक सुहास राजमाने, पवनसिंह पाटील, विवेकानंद पाटील, शिवराज दाभाडे, दिलावर ...

मिशन संवेदना उपक्रमास शिरोळमध्ये प्रतिसाद
सहायक पोलीस निरीक्षक शिवानंद कुंभार, स्वामी समर्थ सूतगिरणीचे कार्यकारी संचालक सुहास राजमाने, पवनसिंह पाटील, विवेकानंद पाटील, शिवराज दाभाडे, दिलावर मोमीन यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी सुहास राजमाने म्हणाले, शिरोळ भागात महापुरानंतर कोरोनाचे संकट जनतेसमोर आले आहे. सामान्य माणसाला जगणे मुश्कील झाले आहे. पोलीस प्रशासनाच्या मिशन संवेदना अंतर्गत सपोनि कुंभार यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी गरीब व्यक्तींना मदत करून खाकी वर्दीतील माणुसकी दाखविली. याप्रसंगी मदन मधाळे, सुनील पाटील, संतोष जाधव, सुरेश सावंत, सुवर्णा गायकवाड, प्रिया कदम, आदी उपस्थित होते.
फोटो - १८०५२०२१-जेएवाय-०३
फोटो ओळ - शिरोळ येथे गरजूंना जीवनावश्यक साहित्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी सपोनि शिवानंद कुंभार, सुहास राजमाने, मदन मधाळे, सुनील पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.