‘सेराफ्लस’ च्या रक्तदान शिबिरास प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:17 IST2021-07-18T04:17:38+5:302021-07-18T04:17:38+5:30
कोल्हापूर : सेराफ्लस इंडिया प्रा. लि. चे संचालक उदय थिटे यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. ...

‘सेराफ्लस’ च्या रक्तदान शिबिरास प्रतिसाद
कोल्हापूर : सेराफ्लस इंडिया प्रा. लि. चे संचालक उदय थिटे यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. यामध्ये ५५ दात्यांनी रक्तदान केले. कोरोना महामारीमुळे राज्यात रक्तटंचाई असल्याने कंपनीने उदय थिटे यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराचे उद्घाटन संचालक संजीव तुंगतकर यांच्या हस्ते व संचालक विलास जाधव, सुनीता थिटे, अक्षय थिटे यांच्या उपस्थित झाले. शिबिर यशस्वी करण्यासाठी संजीव तुंगतकर, विलास जाधव, अक्षय तिटे, उद्धव संकपाळ, अमर घोरपडे, दत्ता पाटील, संग्राम पाटील, कामगार यांचे सहकार्य लाभले.
फोटो ओळी : सेराफ्लस इंडिया प्रा. लि. चे संचालक उदय थिटे यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. (फोटो-१७०७२०२१-कोल-सेराफ्लस)