कबनुरात प्रतिबंधक लसीकरणास प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:24 IST2021-04-27T04:24:23+5:302021-04-27T04:24:23+5:30

कबनूर : येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कोरोना प्रतिबंधक लसीकरणास नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत सकाळपासूनच रांगा लावून लस घेतल्याने सोमवारी ...

Response to preventive vaccination in Kabunura | कबनुरात प्रतिबंधक लसीकरणास प्रतिसाद

कबनुरात प्रतिबंधक लसीकरणास प्रतिसाद

कबनूर : येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कोरोना प्रतिबंधक लसीकरणास नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत सकाळपासूनच रांगा लावून लस घेतल्याने सोमवारी लसीकरणाचा उच्चांक गाठला. एकूण चारशे लोकांनी लसीकरण करून घेतल्याची माहिती आरोग्यसेवक असिफ मोमीन यांनी दिली.

शासनाने ४५ वर्षांवरील सरसकट व्यक्तींना कोरोना लस देण्याची मोहीम सुरू केली आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १६ मार्चपासून कोविड प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. मात्र, सुरुवातीला नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद होता. आता लोकांच्यात जागृती झाल्याने प्रतिसाद वाढत आहे. येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे लसीकरणाचे उद्दिष्ट ११७१३ असून आत्तापर्यंत २८९६ इतके लसीकरण झालेले आहे. दररोज आरोग्य खात्यातून केंद्रासाठी जितकी लस उपलब्ध होते, ती त्यादिवशी दिल्या जातात. सोमवारी एका दिवसात ४०० नागरिकांना लस दिली आहे. लसीचा साठा शून्य आहे. पुहा लस उपलब्ध झाली तरच येणाºया नागरिकांना लस दिली जाणार आहे.

चौकट

सोशल डिस्टन्सचे पालन नाही लस घेण्यासाठी पहाटे पाच वाजल्यापासूनच नागरिक नंबर लावून उभे होते. नागरिकांनी मास्क लावलेले दिसत होते परंतु सोशल डिस्टन्सचे पालन त्यांच्याकडून होत नव्हते. ४०० लोकांची नोंद पूर्ण झाल्यानंतर इतर लोकांना लस संपल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सकाळपासून नंबर लावलेले अनेक वयस्कर नागरिक नाराज झाले.

फोटो ओळी

२६०४२०२१-आयसीएच-०७

२६०४२०२१-आयसीएच-०८

कबनूर (ता.हातकणंगले) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात लसीकरणासाठी लोकांनी लावलेली रांग

छाया-पल्लवी फोटो,कबनूर.

Web Title: Response to preventive vaccination in Kabunura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.