कृत्रिम विसर्जन कुंडात गणेशमूर्ती विसर्जनास प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:29 IST2021-09-12T04:29:38+5:302021-09-12T04:29:38+5:30

कोल्हापूर : महापालिकेतर्फे शहरात दीड दिवसाचे गणेशमूर्ती, निर्माल्याचे विसर्जन करण्यासाठी कृत्रिम कुंड निर्माण केले होते. विभागनिहाय याची सोय केल्याने ...

Response to immersion of Ganesha idol in artificial immersion pool | कृत्रिम विसर्जन कुंडात गणेशमूर्ती विसर्जनास प्रतिसाद

कृत्रिम विसर्जन कुंडात गणेशमूर्ती विसर्जनास प्रतिसाद

कोल्हापूर : महापालिकेतर्फे शहरात दीड दिवसाचे गणेशमूर्ती, निर्माल्याचे विसर्जन करण्यासाठी कृत्रिम कुंड निर्माण केले होते. विभागनिहाय याची सोय केल्याने बहुतांशी भक्तांनी या कुंडातच मूर्तींचे विसर्जन केले.

जरगनगर, मैलखड्डा, तांबट कमान, रंकाळा पदपथ उद्यान, इराणी खान या परिसरातील १२८, खोल खंडोबा, पंचगंगा तालीम, रंकाळा स्टॅड, मंगेशकरनगर, फुलेवाडी या परिसरातील ७३, रुईकर कॉलनी, मुक्त सैनिक वसाहत, कसबा बावडा, रमणमळा, ताराबाई पार्क परिसरातील ३६, शाहुपुरी व्यापारी पेठ, राजारामपुरी ११ वी गल्ली, सायबर चौक, टेंबलाई मंदिर, राजेंद्रनगर या परिसरातील १४ मूर्तींचे आणि निर्माल्याचे कुंडात विसर्जन करण्यात आले.

फोटो : ११०९२०२१-कोल- कृत्रिम कुंड

कोल्हापूर महापालिकेतर्फे दीड दिवसाचे गणेशमूर्ती, निर्माल्य विसर्जनासाठी शनिवारी असे विविध ठिकाणी कृत्रिम कुंड तयार करण्यात आले होते.

Web Title: Response to immersion of Ganesha idol in artificial immersion pool

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.