गडहिंग्लजच्या घाळी महाविद्यालयात महारक्तदानाला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:27 IST2021-07-14T04:27:55+5:302021-07-14T04:27:55+5:30
‘लोकमत’चे संस्थापक स्व. जवाहरलालजी दर्डा आणि विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक स्व. डॉ. एस. एस. घाळी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय सेवा ...

गडहिंग्लजच्या घाळी महाविद्यालयात महारक्तदानाला प्रतिसाद
‘लोकमत’चे संस्थापक स्व. जवाहरलालजी दर्डा आणि विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक स्व. डॉ. एस. एस. घाळी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, सांस्कृतिक व क्रीडा विभागाच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडले. विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. सतीश घाळी व ‘लोकमत’चे उपसरव्यवस्थापक वितरण (साऊथ) संजय पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजनाने शिबिराचे उद्घाटन झाले. डॉ. घाळी म्हणाले, ‘लोकमत’ने कोरोना महामारीच्या काळात हाती घेतलेला महारक्तदानाचा उपक्रम कौतुकास्पद व जीवनदायी आहे.
प्राचार्य डॉ. पाटील म्हणाले, महाविद्यालयातर्फे दत्तक घेतलेल्या लिंगनूर कानूल, बेकनाळ, बड्याचीवाडी, शेंद्री, हनिमनाळ या गावातही रक्तदान शिबिर घेणार आहोत. ‘लोकमत’ गडहिंग्लज विभागीय कार्यालय प्रमुख राम मगदूम, वितरण अधिकारी धनाजी पाटील व अवधूत पोळ, बातमीदार शिवानंद पाटील, प्रा. शिवाजीराव भुकेले, प्रा. संतोष बाबर, प्रा. नीलेश शेळके, प्रा. डॉ. दत्ता पाटील, अश्विन गोडघाटे, डॉ. सुभाष पाटील, राजू कुंभार आदी उपस्थित होते.
प्रा. अनिल उंदरे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. विकास अतिग्रे यांनी आभार मानले.
------------------------
फोटो ओळी : गडहिंग्लज येथील डॉ. घाळी महाविद्यालयात ‘लोकमत’तर्फे रक्तदान शिबिर झाले. याप्रसंगी डॉ. सतीश घाळी, प्राचार्य मंगलकुमार पाटील, संजय पाटील, शिवाजीराव भुकेले, राम मगदूम, अनिल उंदरे, संतोष बाबर, विकास अतिग्रे, अश्विन गोडघाटे आदी उपस्थित होते.
क्रमांक : १२०७२०२१-गड-०४