मुरगूड येथे रक्तदान शिबिराला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:15 IST2021-07-12T04:15:46+5:302021-07-12T04:15:46+5:30

शिबिराचे उदघाटन माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, सहायक पोलीस निरीक्षक विकास बडवे, सहायक पोलीस उपनिरीक्षक किशोर खाडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक ...

Response to blood donation camp at Murgud | मुरगूड येथे रक्तदान शिबिराला प्रतिसाद

मुरगूड येथे रक्तदान शिबिराला प्रतिसाद

शिबिराचे उदघाटन माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, सहायक पोलीस निरीक्षक विकास बडवे, सहायक पोलीस उपनिरीक्षक किशोर खाडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक कुमार ढेरे,गट शिक्षणाधिकारी डॉ. गणपतराव कमळकर,बिद्री संचालक दत्तामामा खराडे,शाहू कृषी संघाचे अध्यक्ष अनंत फर्नांडिस,दिग्विजय पाटील,प्राचार्य जीवन साळोखे,उपनगराध्यक्ष रेखाताई मांगले, हेमलता लोकरे, प्राचार्य एस.आर.पाटील, राष्ट्रवादी शहराध्यक्ष रणजित सूर्यवंशी,राहुल वंडकर,संदीप कलकूटकी,सुधीर सावर्डेकर,सुशांत मांगोरे, दगडू शेणवी आदींच्या हस्ते झाले. स्वागत लोकमतचे मुरगूड प्रतिनिधी अनिल पाटील यांनी केले. आभार दीपक शेणवी यांनी मानले. सूत्रसंचालन एम. बी. टेपुगडे यांनी केले.

यावेळी उपव्यवस्थापक (आय.सी.डी.) महावीर विभूते, नगराध्यक्ष किरण गवाणकर,नगरसेवक सुहास खराडे,नगरसेवक मारुती कांबळे,शिवाजी सातवेकर,नामदेव भांदिगरे,जगन्नाथ पुजारी,संजय मोरबाळे,राजू भाट,विठ्ठल भोसले,स्वप्नील मोरे,अमर चौगले,अनिल राऊत,खाशाबा भोसले,विजय पाटील,कुरणीचे सरपंच निवास पाटील ,रघुनाथ भारमल,तुकाराम पाटील,रवी परीट,राजू चव्हाण उपस्थित होते.

महिलांची आघाडी

या शिबिरात माजी उपनगराध्यक्षा हेमलता लोकरे,नगरसेविका सुप्रिया भाट, क्रांती विक्रांत भोपळे यांनी रक्तदान केले. भाट यांनी आपला मुलगा प्रथमेश यांच्यासह रक्तदान केले. विरोधी पक्ष नेता राहुल वंडकर आणि पालिका पक्ष प्रतोद संदीप कलकूटकी यांनीही रक्तदान केले.

तरुणांचे सहकार्य

शिबिर पार पाडण्यासाठी मोहन गुजर,दीपक शेणवी,वैभव अर्जुने, हर्षवर्धन मोरबाळे, विजय मोरबाळे, डॅन डेळेकर,स्वराज्य निर्माण संस्था आदींनी सहकार्य केले. तर पोलीस कर्मचाऱ्यांनी अल्पोपहार, सानिका फाउंडेशनने मास्क तर राष्ट्रवादी पक्षाकडून ज्यूस वाटप केले.

फोटो ओळ : मुरगूड ता. कागल येथील लोकमत रक्तदान शिबिराचा प्रारंभ तुळशी रोपाला पाणी घालून करताना माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, डॉ. गणपतराव कमळकर, किशोर कुमार खाडे, दत्तात्रय खराडे,उपनगराध्यक्षा रेखाताई मांगले,हेमलता लोकरे,प्राचार्य एस. आर. पाटील, प्राचार्य जीवन साळोखे आदी उपस्थित हाेते.

Web Title: Response to blood donation camp at Murgud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.