अब्दुल लाटमध्ये महारक्तदान शिबिरास प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:15 IST2021-07-12T04:15:52+5:302021-07-12T04:15:52+5:30
मुरलीधर जाधव यांची गोकूळ संघामध्ये संचालकपदी निवड झाल्याबद्दल शिरोळ पंचायत समितीचे माजी उपसभापती विद्याधर कुलकर्णी यांनी त्यांचा सत्कार केला. ...

अब्दुल लाटमध्ये महारक्तदान शिबिरास प्रतिसाद
मुरलीधर जाधव यांची गोकूळ संघामध्ये संचालकपदी निवड झाल्याबद्दल शिरोळ पंचायत समितीचे माजी उपसभापती विद्याधर कुलकर्णी यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी सरपंच पांडुरंग मोरे, उपसरपंच अण्णाप्पा कचरे, ग्रा.पं. सदस्य मिलिंद कुरणे, नितीन अक्कोळे, दादासाहेब पाटील, रावसाहेब पाटील-नांगरे, आप्पा पाटील, कल्लाप्पा कुमटोळे, मोहन कांबळे, माजी जि.प. सदस्य दादा सांगावे, संजय आवळे, संजय घोरपडे, पोलीस पाटील मानसिंग भोसले, डॉ. राजेंद्र बैरागी, प्रितम पाटील, महावीर गाडवे, नम्रता पाटील, मोहन कांबळे, वसंत कुरूंदवाडे, संजय परीट, डॉ. दशरथ काळे, आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मिलिंद कुरणे, मातोश्री ट्रस्टचे संस्थापक डॉ. वृषभ चौगुले, विज्ञान उपाध्ये यांनी परिश्रम घेतले.
चौकटी
महिलांचाही सहभाग
ग्रामीण भागामध्ये खास करून महिलांमध्ये रक्तदानाचे धाडस कोणी करू शकत नाही; पण येथे नम्रता आप्पासाहेब पाटील, शुभांगी सिद्धार्थ कुरणे, राजश्री संजय शेडबाळे, किशोरी शिरीषकुमार शेडबाळे, केतकी क्रांतिवीर बिरनाळे यांनी रक्तदान केले.
लष्कर जवानाचेही रक्तदान
सागर रामचंद्र कोळी हे लष्करात असून, देशसेवा बजावत आहेत. ते सध्या सुट्टी आले असून, त्यांनीही या रक्तदान शिबिरात सहभाग घेतला.
फोटो ओळी
११०७२०२१-आयसीएच-०१
११०७२०२१-आयसीएच-०२
११०७२०२१-आयसीएच-०३
११०७२०२१-आयसीएच-०४
११०७२०२१-आयसीएच-०५
११०७२०२१-आयसीएच-०६