‘लोकमत’ महाबचत योजनेस दणदणीत प्रतिसाद

By Admin | Updated: January 18, 2015 00:37 IST2015-01-18T00:32:07+5:302015-01-18T00:37:19+5:30

घरोघरी चर्चा : ७० रुपयांत अंकासह दोन आकर्षक भेटवस्तू; सामाजिक उपक्रमांतही सहभाग

Responding to the 'Lokmat' MahaBachat Yojna | ‘लोकमत’ महाबचत योजनेस दणदणीत प्रतिसाद

‘लोकमत’ महाबचत योजनेस दणदणीत प्रतिसाद

कोल्हापूर : कोल्हापुरातील प्रत्येक घटना, घडामोडींचा साक्षीदार होऊन विकासाच्या प्रश्नांत जागल्याची भूमिका बजावणाऱ्या ‘लोकमत’च्या महाबचत योजनेस शहरवासीयांनी भरभरून प्रतिसाद दिला. घरोघरी ‘लोकमत’च्याच वाचक योजनेची चर्चा असून, योजनेत सहभागी होण्यासाठी वाचक पुढाकार घेत आहेत. ‘लोकमत’ने वाचकांच्या विश्वासाच्या बळावर कोल्हापूरमध्ये मानाचे स्थान मिळविले आहे. त्याच विश्वासाच्या बळावर ‘लोकमत’ने वाचकांसाठी कोल्हापूर शहरात यावर्षी ‘महाबचत’ योजना आणली. त्याअंतर्गत ‘लोकमत’साठी सर्वत्र नोंदणी सुरू आहे.
गतवर्षीही ‘लोकमत’ने राबविलेल्या या योजनेला उदंड प्रतिसाद मिळाला. वाचकांच्या आग्रहानुसारच यावर्षी ‘महाबचत’ या नव्या स्वरूपात योजना सुरू केली. या योजनेत दोनशे रुपयांचा चेक (धनादेश) अथवा रोख रक्कम देऊन वाचकांना वर्षासाठी ‘लोकमत’च्या अंकाची नोंदणी करता येते. नोंदणी केल्यानंतर लगेच तुम्हाला २५० रुपयांची भेटवस्तू मिळेल. आठव्या महिन्यानंतर ५५० रुपयांची हमखास आकर्षक भेटवस्तू मिळेल.
महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या ‘लोकमत’ने समाजाच्या सर्वच स्तरांत वेगळे स्थान पटकाविले. थेट पाईपलाईनसह हद्दवाढ, उद्योग-व्यापार प्रश्न, अंबाबाई मंदिर विकास, चित्रनगरी, वाहतूक आदी प्रत्येक प्रश्न सुटण्यासाठी ‘लोकमत’ने भूमिका मांडली. गतवर्षी ‘आता बस्स्’ योजनेतून राज्यकर्त्यांच्याही डोळ््यात अंजन घातले. परिणामी, रखडलेले प्रश्न सोडविण्यास हालचाली झाल्या. सखी मंच, युवा मंच आणि बाल मंचच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमदेखील राबविले. कोल्हापूरच्या मातीशी नाळ जोडलेल्या ‘लोकमत’चे वाचक होण्यासाठी अंकाची नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
वाचकांचा फायदा १२०० रुपयांचा..
योजनेअंतर्गत वाचकांनी अंकाच्या नोंदणीसाठी दोनशे रुपयांचा चेक ‘लोकमत मीडिया प्रा. लि.’ या नावाने अथवा रोख रक्कम वृत्तपत्र विक्रेत्यांकडे अथवा ‘लोकमत’ कार्यालयात द्या. त्यानंतर दरमहा ७० रुपये वृत्तपत्र विक्रेत्याला द्यायचे. नोंदणीनंतर ‘लोकमत’ वर्षभर १४४० रुपयांचे अंक, तसेच २५० रुपयांची पहिली भेटवस्तू आणि आठ महिन्यांनंतर ५५० रुपयांची आकर्षक भेटवस्तू देणार आहे. वाचकांना नोंदणीसाठी एका वर्षासाठी दोनशे रुपये व दरमहा ७० असे एकूण १०४० रुपये द्यावे लागतील. त्या बदल्यात ८०० रुपयांच्या दोन भेटवस्तू आणि १४४० रुपयांचा अंक वर्षभर मिळणार आहे. त्यात वाचकांचा १२०० रुपयांचा मोठा फायदा होणार आहे.
अंकाच्या नोंदणीचा दोनशे रुपयांचा चेक ‘लोकमत मीडिया प्रा. लि.’ या नावाने वृत्तपत्र विक्रेत्यांकडे द्या.
रोख रक्कम देऊनही नोंदणी करण्याची सोय.
योजना कोल्हापूर शहर व उपनगरांसाठी मर्यादित.
अधिक माहितीसाठी येथे संपर्क साधा
योजनेची अधिक माहिती आणि अंकाच्या नोंदणीसाठी येथे संपर्क साधा : मोबाईल : ९८५०३८८३८४, ९९२२९१९४५३, ९९२२९१९४३९ अथवा (०२३०) २४६९४०७ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

Web Title: Responding to the 'Lokmat' MahaBachat Yojna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.