महापालिकेच्यावतीने राजर्षी शाहू महाराज यांना आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:25 IST2021-05-07T04:25:46+5:302021-05-07T04:25:46+5:30
कोल्हापूर : लोककल्याणकारी राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापालिकेच्यावतीने गुरुवारी सिध्दार्थ नगरजवळील नर्सरी बाग येथील राजर्षी शाहू ...

महापालिकेच्यावतीने राजर्षी शाहू महाराज यांना आदरांजली
कोल्हापूर : लोककल्याणकारी राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापालिकेच्यावतीने गुरुवारी सिध्दार्थ नगरजवळील नर्सरी बाग येथील राजर्षी शाहू महाराज समाधी स्मारकस्थळ, दसरा चौक येथील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याला प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.
यावेळी उपआयुक्त शिल्पा दरेकर, उपशहर अभियंता नारायण भोसले, मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक, कादर मलबारी, माजी नगरसेवक जय पटकारे, अजित ठाणेकर, छत्रपती शाहू स्मारक व्यवस्थापक कृष्णाजी हरुगडे, कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले व कर्मचारी उपस्थित होते.
फोटो क्रमांक -०६०५२०२१-कोल-केएमसी०१
ओळ - कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने गुरुवारी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी नर्सरी बागेतील शाहू समाधी स्मारक स्थळ येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन केले. यावेळी उपायुक्त शिल्पा दरेकर उपस्थित होत्या.