मुव्हेबल गाळ्यांचा ठराव बेकायदेशीर असल्याने स्थगिती द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:30 IST2021-08-18T04:30:21+5:302021-08-18T04:30:21+5:30
इचलकरंजी : येथील जलशुद्धिकरण केंद्राजवळील मुव्हेबल गाळ्यांसंदर्भात पालिकेच्या सर्वसाधारण सभेत त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्याचा ठराव करण्यात आला होता. हा ...

मुव्हेबल गाळ्यांचा ठराव बेकायदेशीर असल्याने स्थगिती द्यावी
इचलकरंजी : येथील जलशुद्धिकरण केंद्राजवळील मुव्हेबल गाळ्यांसंदर्भात पालिकेच्या सर्वसाधारण सभेत त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्याचा ठराव करण्यात आला होता. हा ठराव नियमबाह्य व बेकायदेशीर असल्याने ठरावास स्थगिती देण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तत्काळ अहवाल सादर करावा, अशा मागणीचे निवेदन नगरसेवक शशांक बावचकर यांनी मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल यांना दिले.
निवेदनात, गाळे उभारणी केल्याबाबत पालिकेच्या नगररचना विभागाने मुख्याधिकाऱ्यांकडे सविस्तर अहवाल दिला, तसेच आमदार प्रकाश आवाडे यांनी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संबंधित गाळे मुव्हेबल नसून पक्के असल्याने कौन्सिल मान्यतेच्या सुसंगत नसल्याने हे गाळे योग्य ठिकाणी पुनर्वसन करावे, असे म्हटले आहे. हा मार्ग कर्नाटक व महाराष्ट्र राज्य मार्ग आहे, तसेच जलशुद्धिकरण केंद्र असल्याने संवेदनशील असून १०० मीटर अंतरावर कोणतेही कच्चे व पक्के बांधकाम करता येत नसल्याचे शासनाचे निर्देश आहेत. तरीही ६ ऑगस्टच्या कौन्सिल सभेत गाळ्यांचे त्याचठिकाणी पुनर्वसन करण्याचा ठराव केलेला आहे, असे म्हटले आहे.