शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

लिटर मापांनी दूध संकलनास विरोध : वैधमापनशास्त्र विभागाला दिले निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 1:22 AM

कोल्हापूर : दूधसंकलन वाढल्याने पारंपरिक पद्धतीने लिटर, पाचशे मिलिलिटर या मापांनी दूधसंकलन करणे अडचणीचे असल्याने इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावरून दूधसंकलन न करण्याच्या आदेशाला प्राथमिक दूध संस्थांनी विरोध केला आहे. संस्थांची अडचण समजावून घेऊन शासनाने सक्ती करू नये, अशी मागणी शिष्टमंडळाने बुधवारी या विभागाकडे केली.प्राथमिक दूध संस्थांमध्ये सध्या इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर दुधाची खरेदी विक्री ...

ठळक मुद्दे संस्थाचालकांसह कर्मचाºयांमधून संताप

कोल्हापूर : दूधसंकलन वाढल्याने पारंपरिक पद्धतीने लिटर, पाचशे मिलिलिटर या मापांनी दूधसंकलन करणे अडचणीचे असल्याने इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावरून दूधसंकलन न करण्याच्या आदेशाला प्राथमिक दूध संस्थांनी विरोध केला आहे. संस्थांची अडचण समजावून घेऊन शासनाने सक्ती करू नये, अशी मागणी शिष्टमंडळाने बुधवारी या विभागाकडे केली.

प्राथमिक दूध संस्थांमध्ये सध्या इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर दुधाची खरेदी विक्री केली जाते; पण यामध्ये शंभर मिलिलिटरपेक्षा कमी दुधाचे वजन होत नसल्याची तक्रार संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रूपेश पाटील यांनी वैधमापनशास्त्र विभागाकडे केली होती. दुधासह कोणत्याही द्रवरूप पदार्थाचे वजन करता येत नाही, असे कायदा सांगतो. त्यामुळे दूधसंकलन इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर करता येणार नाही. त्यासाठी लिटर मापांचा वापर करण्याचे आदेश वैधमापनशास्त्र विभागाचे सहायक नियंत्रक नरेंद्रसिंह मोहनसिंह यांनी दिले आहेत. या आदेशाने प्राथमिक दूध संस्थांमध्ये एकच खळबळ उडाली असून, त्यांनी या आदेशाला विरोध केला आहे. हा आदेश रद्द करण्याची मागणी दूध संस्था कर्मचारी संघटनेच्या वतीने केली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष के. डी. पाटील, शामराव पाटील, विश्वास पाटील, सुरेश जाधव, दत्तात्रय बोळावे, सुभाष गुरव, आदी उपस्थित होते.‘गोकुळ’लाही फटका बसणार!‘गोकुळ’च्या संकलनात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच चंदगड, शाहूवाडी, गगनबावड्यासह आजरा तालुक्यांच्या डोंगरमाथ्यावरून दूध चिलिंंग सेंटरवर पोहोचते. संकलनासाठी वेळ झाला तर दुधाच्या वाहतुकीस विलंब होऊन दूध खराब होण्याच्या तक्रारी वाढणार आहेत. त्याचा थेट फटका जरी संस्थांना बसणार असला तरी त्याची झळ ‘गोकुळ’लाही सोसावी लागणार आहे.शिष्टमंडळ मंत्र्यांना भेटणारवैधमापनशास्त्र विभागाची सक्ती ही संस्थेवर अन्याय करणारी असल्याने हा आदेश रद्द करावा. या मागणीसाठी ‘गोकुळ’सह दूध संस्था कर्मचारीसंघटनेचे शिष्टमंडळ लवकरच अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापटयांची भेट घेणार आहे.वाढीव दुधाचा उत्पादकांनाच परतावाइलेक्ट्रॉनिक वजनकाट्यामुळे ५१ मिलिलिटर दूध झाल्यास ते १०० मिलिलिटर मोजले जाते; तर ४९ मिलिलिटर असेल तर त्याचे मोजमाप होत नाही; पण या वाढीव दुधामुळे झालेला नफा रिबेट, दूध फरकातून उत्पादकांनाच दिला जातो, असा दावा संस्थांनी केला आहे.या आहेत संस्थांच्या अडचणीूध उत्पादन वाढल्याने वेळेत संकलन होणे अवघड.तोकड्या पगारावर कोणी काम करण्यास तयार नाहीत.कर्मचाºयांची संख्या वाढवावी लागणार. पर्यायाने संस्थांवर अतिरिक्त बोजा.लिटरने दूध मोजताना कर्मचाºयाचे विस्मरण होण्याचा धोका.संस्थांचे दूधसंकलनापासून दूध बिले वाटपापर्यंतचे काम रेंगाळणार.