कोल्हापुरातील निवासी डॉक्टरही बेमुदत रजेवर

By Admin | Updated: March 21, 2017 12:29 IST2017-03-21T12:29:44+5:302017-03-21T12:29:44+5:30

सीपीआरच्या आवारात रॅली : सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्याची मागणी

A resident doctor in Kolhapur, on the indefinite leave | कोल्हापुरातील निवासी डॉक्टरही बेमुदत रजेवर

कोल्हापुरातील निवासी डॉक्टरही बेमुदत रजेवर

आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर : मुंबईच्या सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टरला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मंगळवारी कोल्हापूरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील (सीपीआर) मार्ड संघटनेतील निवासी डॉक्टरही बेमुदत रजेवर गेले आहेत.
सीपीआरच्या आवारातील राजर्षि शाहू महाराज शासकीय वैद्यकिय महाविद्यालय अधिष्ठाता कार्यालयासमोर सोमवारी या निवासी डॉक्टरांनी काळ्या फिती लावून निदर्शने केली. सीपीआरमधील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करत नाही, तोपर्यंत काम बंद राहणार असल्याचे निवासी डॉक्टरांनी यावेळी सांगितले. यानंतर सीपीआरच्या आवारातून मार्डचे जिल्हाध्यक्ष डॉ. रामप्रसाद राजेभोसले यांच्यासह निवासी डॉक्टरांनी रॅली काढली .या रॅलीत सुमारे अडीचशेहून निवासी डॉक्टर सहभागी झाले होते.

Web Title: A resident doctor in Kolhapur, on the indefinite leave