रेश्मा माने, विक्रम कुऱ्हाडे यांना कुस्तीत कांस्यपदक
By Admin | Updated: February 5, 2015 00:29 IST2015-02-05T00:25:20+5:302015-02-05T00:29:26+5:30
कांस्यपदकांसाठी झालेल्या लढतीमध्ये केरळच्या सपनाला एकेरी पट काढून चितपट केले. ती मोतीबाग तालमीची खेळाडू आहे

रेश्मा माने, विक्रम कुऱ्हाडे यांना कुस्तीत कांस्यपदक
कोल्हापूर : केरळ येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोल्हापुरातील रेश्मा माने आणि विक्रम कुऱ्हाडे यांनी कुस्ती क्रीडा प्रकारात कांस्यपदक पटकाविले. बुधवारी रेश्मा अनिल माने हिने ६३ किलो फ्रिस्टाईल गटात दिल्लीच्या बबिता नागरला ढाक डावावर चितपट केले. मात्र, उत्तरप्रदेशच्या रजनीसोबत झालेल्या कुस्तीमध्ये तिला पराभव पत्करावा लागला. कांस्यपदकांसाठी झालेल्या लढतीमध्ये केरळच्या सपनाला एकेरी पट काढून चितपट केले. ती मोतीबाग तालमीची खेळाडू आहे. तसेच कोल्हापूरच्याच विक्रम कुऱ्हाडे याने ५९ किलो ग्रीको रोमन गटात पंजाबच्या काका कुमार याच्यावर सहा-चार गुणांनी मात करीत कांस्यपदक पटकाविले. तो आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाचा खेळाडू आहे. /आणखी वृत्त्त क्रीडा पानावर
सीनिअर गटात कांस्यपदक मिळाल्याने माझा आत्मविश्वास वाढला आहे. या कामगिरीत सुधारणा करून सुवर्णपदक मिळवण्याकडे लक्ष केंद्रित करणार आहे. तसेच आॅलिम्पिकसाठी पात्र होण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
- रेश्मा माने, कुस्तीपटू