पोलीसपाटील पदांची आरक्षणे घोषित

By Admin | Updated: November 24, 2015 00:21 IST2015-11-23T23:51:37+5:302015-11-24T00:21:00+5:30

४५ गावांचा समावेश : शिरोळ, हातकणंगले तालुका

Reservations for the post of PolicePolice are announced | पोलीसपाटील पदांची आरक्षणे घोषित

पोलीसपाटील पदांची आरक्षणे घोषित

इचलकरंजी : येथील प्रांताधिकारी कार्यालयामध्ये शिरोळ व हातकणंगले तालुक्यांतील रिक्त असलेली पोलीसपाटलांची पदे भरण्यासाठी आरक्षणाची सोडत काढण्यात आली. एकूण ४५ गावांपैकी सर्वसाधारण (खुला) वर्गासाठी १३, सर्वसाधारण (महिला) आठ, अनुसूचित जाती दोन, अनुसूचित जाती (महिला) एक, अनुसूचित जमाती पाच, अनुसूचित जमाती (महिला) दोन, विमुक्त जाती (अ) दोन, भटक्या जमाती (ब) एक, भटक्या जमाती (क) एक, इतर मागासवर्ग सात व इतर मागासवर्ग (महिला) तीन, अशी आरक्षणे टाकण्यात आली. ही आरक्षणे प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांच्या मार्गदर्शनाखाली टाकली.इचलकरंजी उपविभागांतर्गत शिरोळ व हातकणंगले या दोन तालुक्यांत पोलीसपाटलांची ४५ पदे रिक्त होती. त्यांच्यासाठी शुक्रवारी काढण्यात आलेल्या सोडतीवेळी शिरोळचे तहसीलदार सचिन गिरी, हातकणंगलेचे तहसीलदार दीपक शिंदे, नायब तहसीलदार अनिल साळुंखे, लिपिक बबन पाटील, अनिल शिंदे, काही गावांतील सरपंच व नागरिक उपस्थित होते. लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने आरक्षणे निश्चित करण्यात आली. या आरक्षणांमधून महिलांसाठी चिठ्ठी पद्धतीने आरक्षणे काढली गेली. (प्रतिनिधी)


गावनिहाय टाकण्यात आलेली आरक्षणे पुढीलप्रमाणे : अनुसूचित जाती (महिला) : रुकडी. अनुसूचित जाती : कोरोची व पट्टणकोडोली. अनुसूचित जमाती (महिला) : शिरढोण व उदगाव. अनुसूचित जमाती : लाटवडे, जांभळी, हेरवाड, टाकवडे व अकिवाट. विमुक्त जाती (अ) : कुंभोज व उमळवाड. भटक्या जाती (ब) : यळगूड. भटक्या जमाती (क) : चंदूर. इतर मागासवर्ग (महिला) : राजापूर, साजणी व भेंडवडे. इतर मागासवर्ग : इंगळी, शिरटी, नागाव, यड्राव, तळंदगे, खोची व नेज. सर्वसाधारण (खुला-महिला) : टाकळी, मजरेवाडी, मजले, खिद्रापूर, दानवाड, हालोंडी, हरोली व कुटवाड. सर्वसाधारण (खुला) : नांदणी, दानोळी, गणेशवाडी, औरवाड, शिवनाकवाडी, निमशिरगाव, चिंचवाड, चोकाक, माले, मुडशिंगी, पाडळी, बस्तवाड व तमदलगे.
४पोलीस पाटलांची पदे लवकरच लेखी व तोंडी परीक्षेद्वारे भरण्यात येतील. त्यासाठी प्रांताधिकारी, दोन पोलीस उपअधीक्षक व दोन तहसीलदार यांच्या समितीद्वारे या परीक्षांमधील उत्तरपत्रिका व तोंडी परीक्षेचे परीक्षण करण्यात येऊन निवड केली जाईल.

Web Title: Reservations for the post of PolicePolice are announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.