आरक्षणामुळे महिलांना कर्तृत्वाची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:26 IST2021-03-09T04:26:31+5:302021-03-09T04:26:31+5:30
गडहिंग्लज : एकेकाळी वेतनासाठी, मताच्या अधिकारांसाठी महिलांना संघर्ष करावा लागला. परंतु, आता आरक्षणामुळे महिलांनाही कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी ...

आरक्षणामुळे महिलांना कर्तृत्वाची संधी
गडहिंग्लज : एकेकाळी वेतनासाठी, मताच्या अधिकारांसाठी महिलांना संघर्ष करावा लागला. परंतु, आता आरक्षणामुळे महिलांनाही कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांनी केले.
महिला दिनानिमित्त श्री रवळनाथ को-ऑप हौसिंग फायनान्स सोसायटी तर्फे आयोजित महिला स्वच्छता कामगार व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सत्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले होते. कागलच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ठोकडे म्हणाले, कुटुंब आणि समाजाच्या प्रगतीमध्ये महिलांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे त्यांच्या आकांक्षा आणि विचारांचा आदर करून त्यांना माणुसकीची वागणूक द्यायला हवी.
यावेळी संचालिका उमा तोरगल्ली यांचेही भाषणे झाले. संस्थापक चौगुले यांनी प्रास्ताविक केले. मीना रिंगणे यांनी स्वागत केले. गौरी बेळगुद्री व अंजना हजारे यांनी सूत्रसंचलन केले. रेखा पोतदार यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्राचार्य आर. एस. निळपणकर, डॉ. संजय चौगुले, प्रा. विजय आरबोळे उपस्थित होते.
रौप्यमहोत्सवातील पहिला उपक्रम
: गडहिंग्लज नगरपालिका व उपजिल्हा रूग्णालयातील महिला स्वच्छता कामगारांचा संस्थेतर्फे साडीचोळी देऊन सत्कार करण्यात आला. या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाने ‘रवळनाथ’च्या रौप्यमहोत्सवी वर्षातील कार्यक्रमांची सुरूवात झाली.
यशाचे श्रेय सफाई कामगारांनाच : स्वच्छ सर्व्हेक्षणात देशपातळीवर यश मिळवून साडेबारा कोटीची बक्षिसे मिळविल्याबद्दल नगराध्यक्षा कोरी यांचा ‘रवळनाथ’तर्फे सत्कार झाला. त्यांनी या यशाचे संपूर्ण श्रेय सफाई कामगारांनाच दिले.
फोटो ओळी : गडहिंग्लज येथे ‘रवळनाथ’तर्फे महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा नगराध्यक्षा स्वाती कोरी, तहसीलदार शिल्पा ठोकडे, एम. एल. चौगुले यांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी उमा तोरगल्ली, मीना रिंगणे, रेखा पोतदार उपस्थित होते.
क्रमांक : ०८०३२०२१-गड-०६