शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
2
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
3
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
4
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
5
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
6
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
7
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
8
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
9
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
10
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
11
Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता
12
"ते माझं भवितव्य बरबाद करतील...", 'इंडियन आयडल' जिंकल्यानंतर अभिजीत सावंतने केलेला मोठा गौप्यस्फोट
13
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
14
पुन्हा राज्यसभेवर संधी मिळेल का? मोदी सरकारमधील सहा मंत्र्यांची 2026 मध्ये ‘अग्निपरीक्षा’
15
अरे हे काय! मुंबईच्या संघात दोन-दोन रोहित; व्हायरल फोटो पाहून चाहते थक्क, हिटमॅनचा 'ड्युप्लिकेट' कोण?
16
सरकारी कर्मचारी दांपत्यांना दिलासा! पती-पत्नीची एकाच शहरात नियुक्ती करण्याचे केंद्राचे निर्देश
17
Ola Electric ला सरकारकडून मिळणार ३६६.७८ कोटी रुपयांचा मोठा दिलासा; शेअरमध्ये जोरदार तेजी, जाणून घ्या
18
Malegaon Municipal Corporation Election : मालेगावमध्ये एमआयएम-काँग्रेस युतीचा प्रयोग; वरिष्ठांच्या हालचाली, जागा वाटपाचीही चर्चा
19
Accident : भाड्याने थार घेतली, गर्लफ्रेंडला भेटायला निघाला; समोर कुटुंब दिसताच गाडी पळवू लागला अन्... 
20
क्रिकेटमधील उल्लेखनीय कामगिरीची दखल; वैभव सूर्यवंशीचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरव
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर महापालिकेसाठी उद्या आरक्षण सोडत, लढतीचे चित्र होणार स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 19:02 IST

Municipal Election: ११ प्रभांगावर अनुसूचित जाती, २० प्रभागांवर इतर मागास प्रवर्गाचे थेट आरक्षण

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या, मंगळवारी होणाऱ्या आरक्षण सोडतीकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. सोडतीवेळी बहुतांशी आरक्षणे थेट दिली जाणार असली तरीही त्याबाबतची कमालाची उत्सुकता आहे.शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहात ही आरक्षण सोडत जाहीर केली जाणार आहे. ही सोडत प्रक्रिया नागरिकांना प्रत्यक्ष उपस्थित राहून पाहता येईल. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनानुसार या प्रक्रियेतील बरीच आरक्षणे ही थेट दिली जाणार आहेत. त्यामुळे दीड तासात ही प्रक्रिया पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर सर्वच प्रभागातील लढतीचे चित्र स्पष्ट होईल.अनुसुचित जाती प्रवर्गातील आरक्षण असे असेलमहानगरपालिकेच्या ८१ सदस्य असणाऱ्या सभागृहात लोकसंख्येच्या निकषावर अनुसुचित जाती प्रवर्गासाठी ११ प्रभागांवर थेट आरक्षण असेल. या अकरा प्रभागामधील सहा जागा याच प्रवर्गातील महिलांसाठी असतील आणि त्या लॉटरी पध्दतीने निश्चित केल्या जातील.

क्रमांक / वॉर्ड क्रमांक / अ. जा. संख्या१. वॉर्ड क्र. ४ / ९३७६२. वॉर्ड क्र. १८ / ६८७७३. वॉर्ड क्र. १७ / ५८८६४. वॉर्ड क्र. १३ / ५२४६५. वॉर्ड क्र. १५ / ४८७३६. वॉर्ड क्र. १ / ४८३७७. वॉर्ड क्र. ११ / ४१०३८. वॉर्ड क्र. १९ / ४०१९९. वॉर्ड क्र.२ / २८९५१०. वॉर्ड क्र.६ / २८३७११. वॉर्ड क्र. २० / ३४९७

इतर मागास प्रवर्गाचे आरक्षण असे असेलइतर मागास प्रवर्गातून २१ सदस्य निवडून द्यायचे आहेत. त्यामुळे याही जागांचे आरक्षण थेट दिले जाणार आहे. महापालिकेसाठी एकूण २० प्रभाग आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रभागात एक जागा थेट इतर मागास प्रवर्गातील सदस्यासाठी आरक्षीत केली जाईल. एक सदस्याची जी जागा राहिल ती प्रभाग क्रमांक २० मध्ये आरक्षीत ठेवली जाणार आहे. पाच सदस्य असणाऱ्या प्रभागात जास्तीत जास्त दोन इतर मागास प्रवर्गाचे सदस्य असावेत असा राज्य निवडणूक आयोगाची नियम आहे. २१ जागांवर थेट आरक्षण दिल्यानंतर त्यातून महिलांसाठी ११ जागा या लॉटरी पध्दतीने आरक्षित केल्या जाणार आहेत.

सर्वसाधारण प्रवर्गासाठी ४९ जागामहापालिका सभागृहातील ४९ जागा या सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुल्या राहणार आहेत. ज्या ज्या प्रभागात अनुसुचित जाती पुरुष व महिला तसेच इतर मागास प्रवर्गातील पुरुष व महिला हे आरक्षण सोडून प्रत्येक प्रभागात दाेन जागा या सर्वसाधारण प्रवर्गासाठी असतीत. त्याशिवाय नऊ प्रभागांत तीन जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी असतील. सर्वसाधारण प्रवर्गासाठीच्या ४९ जागापैकी २५ जागा याच प्रवर्गातील महिलांसाठी लॉटरी पध्दतीने आरक्षण दिले जाईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Municipal Corporation Election: Reservation Draw Tomorrow, Clearer Picture Emerges

Web Summary : Kolhapur is gearing up for municipal elections. Tomorrow's reservation draw will determine seat allocation for Scheduled Castes, Other Backward Classes, and the general category. The process will be streamlined, with many reservations assigned directly. This draw will clarify the electoral landscape.