बेळगाव जिल्ह्यातील तालुका जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:17 IST2021-07-03T04:17:04+5:302021-07-03T04:17:04+5:30
निपाणी : प्रतिनिधी कर्नाटक राज्यातील तालुका व जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी रात्री उशिरा आरक्षण जाहीर केले ...

बेळगाव जिल्ह्यातील तालुका जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर
निपाणी : प्रतिनिधी
कर्नाटक राज्यातील तालुका व जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी रात्री उशिरा आरक्षण जाहीर केले आहे. यामुळे आता लवकरच राज्यात निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. निपाणी तालुका पंचायत झाल्यानंतर प्रथमच निवडणुका होत आहेत.
निपाणी तालुक्यात १६ तालुका पंचायत तर ६ जिल्हा पंचायत मतदारसंघ आहेत.
एकूण आरक्षणाचा विचार करता ५० टक्के जागा महिलांसाठी आहेत. यापूर्वी जिल्हा पंचायतीचे ४ मतदारसंघ होते पण आता नव्याने बेनाडी, सौंदलगा, बेडकिहाळ हे तीन मतदार संघ अस्तित्वात आले आहेत. तर कोगनोळी, कारदगा, अकोळ हे जुने मतदारसंघ कायम ठेवले आहेत. तर यापूर्वीचा भोज मतदारसंघ गोठविण्यात आला आहे. त्यामध्ये आता ०२ मतदारसंघ वाढविण्यात आले आहेत. तर तालुका पंचायतीचे ४ मतदारसंघ गोठविले आहेत. जाहीर झालेल्या आरक्षणासंबंधी आक्षेप असल्यास ८ जुलैपर्यंत कर्नाटक राज्य निवडणूक आयोग संचालक बेंगळुरू यांच्याकडे तक्रार नोंदवता येणार आहे.
जिल्हा पंचायतीचे आरक्षण पुढीलप्रमाणे अकोळ : एस. टी.
कोगनोळी : ओबीसी (अ), सौंदलगा : ओबीसी (अ) महिला
कारदगा : ओबीसी (अ), बेडकिहाळ : एस. सी. महिला बेनाडी : सामान्य
तालुका पंचायत मतदारसंघाचे आरक्षण पुढीलप्रमाणे : - अकोळ : ओबीसी (ब) बेडकिहाळ : एस. सी. महिला बेनाडी : एस. सी.
भोज : सामान्य महिला गळतगा : सामान्य महिला जत्राट : एस. टी. महिला कोगनोळी : जनरल महिला कारदगा : ओबीसी (अ) महिला कुरली : ओबीसी (अ) महिला माणकापूर : सामान्य
सौंदलगा : एस.सी. महिला कोडणी : ओबीसी ( अ ) महिला
कुन्नर : सामान्य
शेंडूर : सामान्य आडी : सामान्य
मांगूर | : सामान्य