शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

संशोधकांनी शोधली पर्णरेषी बोटांच्या पालीची नवी प्रजात, कोल्हापूरातील तिघांचा सहभाग

By संदीप आडनाईक | Updated: May 11, 2023 14:50 IST

ही प्रजाती निशाचर असुन छोटे किटक हे त्यांचं प्रमुख खाद्य

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील संशोधकाना तामिळनाडूतील थुतुकुडी (तुतिकोरीन) जिल्ह्यातून पर्णरेषी बोटांच्या पालीच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात यश मिळाले आहे. या नव्या पालीच्या प्रजातीला हेमिडॅक्टिलस क्वार्टझाइटीकोलस (क्वार्टझाइट ब्रुकीश गेको) असे नाव देण्यात आले आहे. या संशोधनामधेकोल्हापूरचे संशोधक अक्षय खांडेकर, स्वप्निल पवार, सतपाल गंगलमाले यांचा समावेश आहे. ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे तेजस ठाकरे, ईशान अगरवाल, विवेक वाघे आणि रेप्टाईल कॉन्झर्वेशन ऑफ इंडियाचे रामेश्वरम मरीआप्पन यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन करण्यात आले.पृष्ठभागाला धरुन ठेवण्यासाठी आवश्यक असणारे बोटांवरील लॅमेले विभागलेले असल्यामुळे या प्रजातीचा समावेश हेमिडॅक्टिलस या पोटजातीत केलेला आहे. गारगोटीसदृश्य खडकांच्या (क्वार्टझाइट) अधिवासात आढळत असल्यामुळे या प्रजातीला क्वार्टझाइटीकोलस असे नाव दिलेले आहे. या पालींच्या बोटांच्या खाली असणारे लॅमेले वृक्षांच्या पानांवरील रेषांशी साधर्म्य साधतात म्हणून त्यांना 'पर्णरेषी बोटांच्या पाली' म्हणतात. घरांमधे भिंतीवर दिसणाऱ्या पाली याच पोटजातीतील आहेत. या प्रजाती घरांत आढळणार्या छोट्या 'ब्रुकीश' पालींच्या गटात मोडतात. या त्यांच्या जवळच्या भाईबंदांपासून हेमिडॅक्टीलस ग्लेडोई हे८०० किमी उत्तरेकडून मध्य भारत आणि पाकिस्तानातून ज्ञात आहेत.

जनुकीय संच, आकारशास्त्रानुसार वेगळी पाल

ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या भारतीय द्वीपकल्पामधील पालींच्या सर्व्हेक्षणादरम्यान ही पाल प्रथमतः आढळली. पाठीवरील ट्युबरकलची वैशिष्टपूर्ण रचना, त्यांचा आकार, जनुकीय संच आणि आकारशास्त्राच्या अभ्यासाअंती ही प्रजाती इतर पालींपेक्षा वेगळी असल्याचे सिद्ध झाले. तज्ञांच्या पुष्टीनंतर जर्मनीच्या व्हर्टिब्रेट्स झूलॉजी या आंतराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकेमधून याविषयी शोधनिबंध प्रकाशीत झाला आहे. ही प्रजाती थुतुकुडी जिल्ह्यातील ४० किमी अंतरावरील दोन टेकड्यांवरुन नोंदवली.या नव्या प्रजातीच्या पाली शुष्क पानझडी वनांनी व्यापलेल्या छोट्या टेकड्यांवरील क्वार्टझाइटच्या खडकांवरती सापडतात. या टेकड्यांची समुद्रसपाटीपासूनची उंची ३५० मीटर पेक्षा कमी आहे. ही प्रजाती निशाचर असुन छोटे किटक हे त्यांचं प्रमुख खाद्य आहे. क्वार्टझाईटच्या उघड्या खडकांवरती भक्ष्य पकडण्यासाठी, या पाली रात्री बाहेर पडतात आणि दिवसा खडकांच्या भेगांमधे विश्रांती घेतात. या नव्या शोधामुळे, शुष्क पानझडी वनांनी व्यापलेल्या छोट्या टेकड्यांच्या आणि क्वार्टझाइट खडकांच्या अधिवासाचे महत्त्व नव्याने अधोरेखित झालेले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरResearchसंशोधन