संशोधनविषयक ‘आविष्कार’ १७ पासून; साताऱ्यामधून प्रारंभ
By Admin | Updated: December 10, 2014 00:30 IST2014-12-10T00:25:45+5:302014-12-10T00:30:45+5:30
शिवाजी विद्यापीठात होणाऱ्या महोत्सवाचे वेळापत्रक

संशोधनविषयक ‘आविष्कार’ १७ पासून; साताऱ्यामधून प्रारंभ
कोल्हापूर : विद्यार्थ्यांमध्ये संशोधकवृत्ती रुजविण्याच्या उद्देशाने राज्यपालांनी ‘आविष्कार’ हा आंतरविद्यापीठीय संशोधन महोत्सव सुरू केला आहे. शिवाजी विद्यापीठात जिल्हास्तरीय, पदव्युत्तर आणि मध्यवर्ती गटात यावर्षी महोत्सव होईल. त्याची सुरुवात जिल्हास्तरीय महोत्सवाने १७ डिसेंबरपासून साताऱ्यामधून होणार आहे.या महोत्सवात सहा गटांतर्गत मानव्यशास्त्र, भाषा, कला, शिक्षण, वाणिज्य, व्यवस्थापन, विधि, शुद्धशास्त्र, कृषी, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र आदी विद्याशाखांमधून स्पर्धा होईल. जिल्हास्तरीय महोत्सवात पदवीपर्यंतचे विद्यार्थी, कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्'ांतील विद्यार्थी, संशोधक व शिक्षक हे पदव्युत्तर विभागात सहभागी होऊ शकतात. यावर्षी दहिवडी महाविद्यालय, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, अशोकराव माने ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट यांना जिल्हास्तरीय महोत्सवाचे यजमानपद मिळाले आहे. जिल्हा व पदव्युत्तर विभागापातळीवर विजेते स्पर्धेक शिवाजी विद्यापीठात होणाऱ्या मध्यवर्ती स्पर्धेत सहभागी होतील. (प्रतिनिधी)
शिवाजी विद्यापीठात होणाऱ्या महोत्सवाचे वेळापत्रक
१७ डिसेंबर : दहिवडी महाविद्यालय (माण, सातारा जिल्हास्तरीय)
१९ डिसेंबर : कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय (वाळवा, सांगली)
२२ डिसेंबर : अशोकराव माने ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट (वाठार, कोल्हापूर)
२४ डिसेंबर : रसायनशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ (पदव्युत्तर विभाग)
२ जानेवारी : रसायनशास्त्र विभाग, विद्यापीठ (मध्यवर्ती महोत्सव)