शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पोखले येथील विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वाचवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 18:49 IST

Forest Department Kolhapur- पन्हाळा तालुक्यातील पोखले गावातील तीस फूट विहिरीत पडलेल्या कोल्ह्यास वनविभागाच्या पथकाने सुखरूप बाहेर काढून किरकोळ उपचारानंतर अधिवासात मुक्त केले.

ठळक मुद्देपोखले येथील विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वाचवले वन्यजीवच्या पथकाचे बचाव कार्य : उपचारानंतर सोडले अधिवासात

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील पोखले गावातील तीस फूट विहिरीत पडलेल्या कोल्ह्यास वनविभागाच्या पथकाने सुखरूप बाहेर काढून किरकोळ उपचारानंतर अधिवासात मुक्त केले.पोखले येथील विहिरीत गुरुवारी, १ एप्रिल रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पाण्याने भरलेल्या विहिरीत कोल्हा पडल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यांनी ती तत्काळ पन्हाळा वनविभागाचे वनरक्षक अमर माने, वनपाल विजय दाते आणि वनक्षेत्रपाल प्रियांका दळवी यांना दिली. त्यांनी या कोल्ह्याच्या बचावकार्यासाठी कोल्हापूरवन्यजीव संक्रमण उपचार केंद्राला पाचारण केले.कोल्हापूर वनविभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष वाळवेकर आणि त्यांच्या पथकाने रात्री घटनास्थळी पोहोचून लगेच बचावकार्य सुरू केले. तीस फूट खोल विहिरीत पडलेल्या या कोल्ह्याने विहिरीतील दगडाच्या आधार घेतला होता. डॉ. वाळवेकर आणि ऋषीकेश मेस्त्री सुतार यांनी विहिरीत उतरुन लगेचच या कोल्ह्यास सुखरूप पिंजऱ्यात घेऊन विहिरीबाहेर काढले. ग्रामस्थांच्या उपस्थितीत विहिरीपासून थोड्या अंतरावर या कोल्ह्याला अधिवासात मुक्त करण्यात आले.यावेळी वनरक्षक, वनपाल तसेच डॉ. संतोष वाळवेकर यांनी ग्रामस्थांना कोल्ह्याचा अधिवास आणि अधिवासातील कोल्ह्याचे महत्त्व सांगितले. या बचाव कार्यात कोल्हापूरचे उपवन संरक्षक रावसाहेब काळे, सहाय्यक उपवनसंरक्षक सुनील निकम, वनसेवक पांडुरंग पाटील यांच्यासह वन्यजीव संक्रमण उपचार केंद्राचे अक्षय निकम, यश मयेकर, सिद्ध छेडा, अमित कुंभार, सम्या टायसन तसेच जयवंत मगदूम, अमोल कुंभार,मारुती महापुरे या ग्रामस्थांनी भाग घेतला. 

टॅग्स :wildlifeवन्यजीवforest departmentवनविभागkolhapurकोल्हापूर