आठ सहायक पोलीस निरीक्षकांच्या विनंती बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:30 IST2021-08-18T04:30:45+5:302021-08-18T04:30:45+5:30
कोल्हापूर : पोलीस बदल्यांचे सत्र सुरू असून मंगळवारी कोल्हापूर परिक्षेत्रातील आठ सहायक पोलीस निरीक्षकांच्या विनंती बदल्यांचे आदेश विशेष पोलीस ...

आठ सहायक पोलीस निरीक्षकांच्या विनंती बदल्या
कोल्हापूर : पोलीस बदल्यांचे सत्र सुरू असून मंगळवारी कोल्हापूर परिक्षेत्रातील आठ सहायक पोलीस निरीक्षकांच्या विनंती बदल्यांचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी काढले. यामध्ये कोल्हापुरातील (शाहूपूरी पो. ठा.) परशुराम विष्णू कोरके यांची सातारा येथे बदली झाली तर सोलापूर ग्रामीण येथील प्रशांत आनंदा पाटील आणि सांगलीतील सरिता महादेव लायकर यांची कोल्हापुरात बदली करण्यात आली आहे.
इतर बदल्या पुढीलप्रमाणे (कंसातील सध्याची नियुक्ती) : तुकाराम धोंडू राठोड- पुणे ग्रामीण (सोलापूर ग्रामीण), माधुरी बाळासाहेब तावरे-पुणे ग्रामीण (सोलापूर ग्रामीण), नीलेश नाथा बागाव-सोलापूर ग्रामीण (सांगली), सतीश शिवाजी शिंदे- पुणे ग्रामीण (सातारा), दत्तात्रय परशुराम दराडे - सातारा (सांगली).
विनंतीनुसार बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांनी स्वखर्चाने बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे आहे तसेच त्यांना तत्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.