पक्षनिष्ठा, एकजुटीने कार्य केल्यास कॉँग्रेसला प्रतिष्ठा :
By Admin | Updated: December 29, 2014 00:06 IST2014-12-28T21:46:25+5:302014-12-29T00:06:24+5:30
असे प्रतिपादन माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केले

पक्षनिष्ठा, एकजुटीने कार्य केल्यास कॉँग्रेसला प्रतिष्ठा :
इचलकरंजी : कॉँग्रेस पक्षाची उभारणी जनमाणसांच्या चळवळीतून झाली आहे. अलीकडे मात्र पक्षातीलच काही स्वकियांच्या स्वार्थी आणि तडजोडीच्या राजकारणामुळे पक्षाला घरघर लागली आहे. तरी कार्यकर्त्यांनी सजगतेने आणि पक्षनिष्ठेने काम केले पाहिजे. त्यासाठी एकजूट दाखवून पक्षाला पुन्हा प्रतिष्ठा प्राप्त करून देऊया, असे प्रतिपादन माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केले.
येथील शहर कॉँग्रेस समितीमध्ये कॉँग्रेस पक्षाचा स्थापना दिन साजरा करण्यात आला. त्याचे औचित्य साधून सभासद नोंदणीचा प्रारंभ झाला. त्यावेळी आवाडे बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे होते.
शहर कॉँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश मोरे यांनी स्वागत व नगरसेवक शशांक बावचकर यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी कॉँग्रेस पक्षाच्या एकूणच कारकिर्दीचा आढावा घेतला. यावेळी कॉँग्रेसचे प्रदेश सचिव प्रकाश सातपुते, शहर उपाध्यक्ष विलास गाताडे, अशोकराव आरगे, बाळासाहेब कलागते, आदी उपस्थित होते.