शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

Republic Day2023: देशप्रेम असेही, 70 वर्षीय आजोबा विद्यार्थ्यांच्या गणवेशांना मोफत इस्त्री करून देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 12:28 IST

गैरसोय होऊ नये म्हणून अन्य व्यक्तींचे कपडे इस्त्रीसाठी न घेण्याचा निर्णय

उत्कर्षा पोतदार उत्तुर : येथील ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिकांनी देशप्रेमापोटी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांचे गणवेश मोफत इस्त्री करून देण्याचा निर्णय घेतला आहे. देश प्रेमापोटी स्वतः आर्थिक झळ सोसून उतार वयात आजच्या युवकांसमोर एक आदर्श निर्माण करणाऱ्या या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे, गंगाधर बापू परीट.गंगाधर परीट यांचे मूळ गाव उत्तूर असले तरी कामानिमित्त ते मुंबई ला वास्तव्यास होते. मुंबईत नोकरी करीत असतानाच ते फावल्या वेळेत घराशेजारील इस्त्रीच्या दुकानात दररोज दोन तास काम करीत होते. पाच वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या मूळ गावी उत्तूरला यायचा निर्णय घेतला. येथे आल्यानंतर गारगोटी रोडवरील एका इमारतीमध्ये 'ओम लॉन्ड्री' या नावाने इस्त्रीचे दुकान थाटले. त्यांच्या सुनबाई सैन्यात आहेत व सुनबाईंचे वडीलही सैन्यात होते. त्यांच्या प्रेरणेतून आपणही देश सेवेसाठी काहीतरी करावे अशी कल्पना या ७० वर्षी आजोबांना सुचली. त्यासाठी त्यांनी प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदनासाठी उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांचे गणवेश मोफत इस्त्री करून देण्याचे ठरविले. ता.२३ जानेवारी ते प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येपर्यंत शालेय विद्यार्थ्यांचे गणवेश मोफत इस्त्री करून देणार आहेत. या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून अन्य व्यक्तींचे कपडे इस्त्री साठी न घेण्याचे ठरविले आहे. गंगाधर आजोबांच्या या अनोख्या मोहिमेची चर्चा उत्तूर मध्ये सर्वत्र सुरू आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRepublic Dayप्रजासत्ताक दिनStudentविद्यार्थी