मलकापूर येथे प्रजासत्ताक दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:04 IST2021-02-05T07:04:59+5:302021-02-05T07:04:59+5:30
मलकापूर : शाहुवाडी तालुक्यात प्रजासत्ताक दिन उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. शाहुवाडी तहसील कार्यालय, ...

मलकापूर येथे प्रजासत्ताक दिन साजरा
मलकापूर : शाहुवाडी तालुक्यात प्रजासत्ताक दिन उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. शाहुवाडी तहसील कार्यालय, पोलीस स्थानकासमोर तहसीलदार गुरु बिराजदार यांनी ध्वजारोहण केले. यावेळी गटविकास अधिकारी अनिल वाघमारे, पोलीस निरीक्षक विजय पाटील उपस्थित होते. शाहुवाडी पंचायत समितीसमोर हंगामी सभापती हंबीरराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मलकापूर नगर परिषद येथे नगराध्यक्ष अमोल केसरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नगरसेवक, नगरसेविका, पालिकेचे अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते. सार्वजनिक वाचनालय, मलकापूर येथे वाचनालयाचे अध्यक्ष रमेश पडवळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. वनपरिक्षेत्र कार्यालय, शाहुवाडी येथे वनपरिक्षेत्र अधिकारी नंदकुमार नलवडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.