गडहिंग्लज तालुक्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:04 IST2021-02-05T07:04:54+5:302021-02-05T07:04:54+5:30
* गडहिंग्लज पोलीस परेड मैदानावर प्रांताधिकारी विजया पांगारकर यांच्याहस्ते शासकीय ध्वजारोहण झाले. * गडहिंग्लज नगरपालिकेच्या प्रांगणात नगराध्यक्षा स्वाती कोरी ...

गडहिंग्लज तालुक्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात
* गडहिंग्लज पोलीस परेड मैदानावर प्रांताधिकारी विजया पांगारकर यांच्याहस्ते शासकीय ध्वजारोहण झाले.
* गडहिंग्लज नगरपालिकेच्या प्रांगणात नगराध्यक्षा स्वाती कोरी यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले.
* गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात प्रशासक मंडळाचे अध्यक्ष अभय देसाई यांच्याहस्ते ध्वजोराहण झाले.
* शिवराज महाविद्यालयात संस्थाध्यक्ष किसनराव कुराडे यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले.
* ओंकार महाविद्यालयात संस्थाध्यक्ष राजन पेडणेकर यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले.
* ई. बी. गडकरी होमिओपॅथिक वैद्यकिय महाविद्यालयात प्राचार्य डॉ. आर. पी. डिसोझा यांनी ध्वजारोहन केले.
* क्रिएटिव्ह हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात संस्थाध्यक्ष डॉ. चंद्रशेखर देसाई यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले.
* बॅ. नाथ पै विद्यालयात शाळा समिती सदस्या सीमा भादवणकर यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले.
* गडहिंग्लज हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात मुख्याध्यापक एस. एन. देसाई यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले.
* केदारी रेडेकर आयुर्वेदिक महाविद्यालयात डॉ. सचिन रावळ यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी उमा जरळी, शुभम पाटील, नीळकंठ पोटे, राहुल चौगुले यांचा गौरव झाला.
* किलबिल विद्यालयात दयानंद हत्ती यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले.
* साई इंटरनॅशनल स्कूलमध्ये उद्योजक प्रकाश मोरे यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले.
* श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटीचे ध्वजारोजण संस्थापक-अध्यक्ष एम. एल. चौगुले यांच्याहस्ते झाले. यावेळी सेवानिवृत्त वायुसेना अधिकारी अण्णासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
* बड्याचीवाडी (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण सरपंच सतीश कोळेकर यांच्याहस्ते झाले.
------------------------
* फोटो ओळी :
गडहिंग्लज येथे रवळनाथ हौसिंग फायनान्स सोसायटीचे ध्वजारोहण संस्थापक-अध्यक्ष एम. एल. चौगुले यांच्याहस्ते झाले. यावेळी अण्णासाहेब पाटील, दत्तात्रय मायदेव, संचालक, सल्लागार उपस्थित होते.
क्रमांक : २७०१२०२१-गड-०१