भुदरगड तालुक्यात प्रजासत्ताक दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:04 IST2021-02-05T07:04:38+5:302021-02-05T07:04:38+5:30
भुदरगड तालुक्यात ७२ वा प्रजासत्ताकदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पोलीस मैदानावरील शासकीय ध्वजारोहण प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी यांच्या हस्ते ...

भुदरगड तालुक्यात प्रजासत्ताक दिन
भुदरगड तालुक्यात ७२ वा प्रजासत्ताकदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पोलीस मैदानावरील शासकीय ध्वजारोहण प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी यांच्या हस्ते झाले. पोलीस उपनिरीक्षक अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी ध्वजाला मानवंदना दिली.
यावेळी तहसीलदार अश्विनी अडसुळ, पोलीस निरीक्षक के. एन. पाटील, सभापती किर्ती देसाई, प्राचार्य अर्जन आबिटकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, स्वातंत्र्यसैनिकांचे नातेवाईक उपस्थित होते. ‘
‘कोविड योद्धा’ डॉ. मिलिंद कदम, संगीता बोटे यांचा सत्कार करण्यात आला. तहसीलदार कार्यालयासमोर तहसीलदार अश्विनी अडसुळ यांच्या हस्ते ध्वज़ारोहण झाले. यावेळी नायब तहसीलदार संदीप भूतल, सर्व अधिकारी पदाधिकारी, तलाठी,आदी उपस्थित होते. पोलीस ठाण्यासमोर के. एन. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी उपनिरीक्षक अमित देशमुख, सतीश मयेकर आदींसह पोलीस उपस्थित होते.
पंचायत समिती : सभापती किर्ती देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी सदस्या गायत्री भोपळे, गटविकास अधिकारी एस. जे. पवार, उपअभियंता डी. व्ही. कुंभार, कक्ष अधिकारी कांचन भोईटे आदी उपस्थित होते.
गारगोटी ग्रामपंचायत : सरपंच संदेश भोपळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी उपसरपंच स्नेहल कोटकर व सर्व सदस्य, कर्मचारी उपस्थित होते.
मौनी विद्यापीठ : चेअरमन आशिष कोरगावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. राष्ट्रीय कॅडेट कोअरच्या कॅडेट्सनी कॅप्टन अरविंद चौगले, सचिन भांदिगरे यांच्या नेतृत्वाखाली मानवंदना दिली. यावेळी विश्वस्त शालिनी देसाई, कर्मचारी प्रतिनिधी दीपक खोत, संचालक डॉ. आर. डी. बेलेकर, विजय घोलपे, प्राचार्य अर्जुन आबिटकर, प्राचार्य एस. बी. पाटील उपस्थित होते.