इचलकरंजी : महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान केंद्र दुरुस्ती आणि हरकती सादर करण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या बैठकीस राज्य पातळीवरील १३ राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी उपस्थिती लावून सूचना मांडल्या.महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान केंद्राच्या ठिकाणांची प्रारूप यादी महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली असून, यावर सूचना व दुरुस्तीसाठी सोमवारी आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका क्षेत्रातील सर्व राज्य व राष्ट्रीय पातळीवरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांची बैठक पार पडली. बैठकीच्या प्रारंभी उपायुक्त तथा निवडणूक विभाग प्रमुख नंदू परळकर यांनी राज्य निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार मतदान केंद्र निवडीच्या निकषाबाबत सविस्तर माहिती दिली. काही राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी मतदान केंद्राच्या उपलब्धतेबाबत काही सूचना मांडल्या. या सूचना लेखी स्वरूपात देण्याच्या सूचना आयुक्त पाटील यांनी दिल्या.
Web Summary : Thirteen political parties attended a meeting regarding polling station updates for the Kolhapur-Ichalkaranji municipal elections. Representatives suggested changes to the draft list published online; officials requested written submissions.
Web Summary : कोल्हापुर-इचलकरंजी नगर निगम चुनावों के लिए मतदान केंद्र अपडेट पर तेरह राजनीतिक दलों ने बैठक में भाग लिया। प्रतिनिधियों ने ऑनलाइन प्रकाशित मसौदा सूची में बदलाव का सुझाव दिया; अधिकारियों ने लिखित में सुझाव मांगे।