गुन्हा नोंदवा नाहीतर काय करायचे ते करा मोर्चा काढणारच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:31 IST2021-08-18T04:31:09+5:302021-08-18T04:31:09+5:30
: शिंदेवाडी येथे सभा मुरगूड : पूरग्रस्तांच्या नुकसानीकडे सरकार बघ्याची भूमिका घेत आहे हे वेदनादायी आहे. त्यामुळे शासनाकडून भरीव ...

गुन्हा नोंदवा नाहीतर काय करायचे ते करा मोर्चा काढणारच !
: शिंदेवाडी येथे सभा
मुरगूड : पूरग्रस्तांच्या नुकसानीकडे सरकार बघ्याची भूमिका घेत आहे हे वेदनादायी आहे. त्यामुळे शासनाकडून भरीव नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे या आग्रही मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणारच, कोणतेही कारण सांगून गुन्हे नोंदवा नाहीतर काय करायचे ते करा अगदी अफगाणिस्थानने भारताबरोबर युद्ध केले तरी ठरलेला विराट मोर्चा हा काढणारच, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
शिंदेवाडी (ता. कागल) येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिंदेवाडीचे माजी सरपंच व बिद्री कारखान्याचे संचालक दत्तात्रय खराडे होते. सरपंच परिषद व चिकोत्रा खोरा संघर्ष समितीने आक्रोश मोर्चाला पाठिंबा व्यक्त केला.
मी सरकार विरोधी आंदोलन करतोय म्हणून शेट्टींनी आघाडी सोडली की काय, अशी चर्चा होईल पण शेतकऱ्यांसाठी राजकारण हित कधीच पाहणार नसून विराट मोर्चा काढून सरकारला गुडघे टेकावयाला भाग पाडू, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.
यावेळी प्रदेशाध्यक्ष जालंधर पाटील, यमगेचे सरपंच दिलीपसिंह पाटील,कॉ.अशोक चौगले, सुरुपलीचे उपसरपंच बाळासोा मोरे, बाणगेचे सरपंच रमेश सावंत,निवृत्ती पाटील, सरपंच परिषदेचे दयानंद पाटील, ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, माजी उपसभापती अजित पवार, अध्यक्ष दत्तात्रय खराडे यांनी मनोगत व्यक्त केले. सभेस तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, उपाध्यक्ष बाळासो भराडे, युवा अध्यक्ष शिवाजी कमळकर आदी प्रमुख उपस्थित होते. सूत्रसंचालन सुनील पाटील यांनी केले.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार
कोल्हापूरच्या पुराला कर्नाटकातील कृष्णा नदीवरील मांजरी अंकलीदरम्यानचा पुलाचा भरावसुद्धा कारणीभूत आहे त्यामुळे येथे मोठमोठ्या कमानी तयार करण्याच्या मागणीसाठी आपण येत्या काही दिवसांत बेळगावचे जिल्हाधिकारी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले
फोटो ओळ
शिंदेवाडी (ता. कागल) येथील सभेत बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी व्यासपीठावर ‘बिद्री’चे संचालक दत्तात्रय खराडे प्रदेशाध्यक्ष जालंधर पाटील, अजित पवार, बाळासोा पाटील, जनार्दन पाटील